लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनवृत्तांतर्गत अकोला जिल्ह्यातील ‘मोबाईल स्कॉड’मध्ये असलेल्या दोन वनरक्षकांवर निलंबनाचा कारवाई करण्यात आली. चोरीचे लाकूड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई केल्याने वनपरिक्षेत्र अधिकाºयाने सूड उगवल्याचा आरोप वनरक्षकांनी केला आहे. या विरोधात यवतमाळातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केले आहे.अकोला येथील फिरत्या पथकात धनेश सुरेशराव इंगळे व विनोद शंकरराव लेंडाळे हे वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी ६ मे २०१८ रोजी चोरीचे लाकूड घेऊन जात असलेल्या ट्रक ताब्यात घेतला. ही कारवाई पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. कातखेडे यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी या प्रकरणात ट्रक सोडण्यासाठी मर्जीतील वनरक्षकाच्या मदतीने ‘बॅक डेट’चा आधार घेऊन विक्री परवानगी दिली. त्यांनतर हे प्रकरण दडपण्यात आले. कारवाई केल्यामुळे तीन महिन्यांपासून दोन वनरक्षकांना वेतन दिले नाही. थेट निलंबनाचा प्रस्ताव सहायक उपवनसंरक्षकांकडे पाठविला. त्यांनी निलंबनाच्या कारवाईची शिफारस करत तो प्रस्ताव डीएफओंकडे पाठविला. यावर तत्काळ डीएफओंनी निलंबनाचे आदेश काढले. कोणतीही बाजू ऐकून घेण्यात आली नाही. या कारवाई विरोधात दोन्ही वनरक्षकांनी मुख्य वनसंरक्षकाडे दाद मागितली. पाचवेळा पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आपल्या कार्यालयातील वरिष्ठाच्या विरोधात आंदोलन सुरू केल्याचे या वनरक्षकांनी सांगितले.
अकोल्याच्या दोन वनरक्षकांचे यवतमाळ सीसीएफ कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:50 IST
वनवृत्तांतर्गत अकोला जिल्ह्यातील ‘मोबाईल स्कॉड’मध्ये असलेल्या दोन वनरक्षकांवर निलंबनाचा कारवाई करण्यात आली. चोरीचे लाकूड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई केल्याने वनपरिक्षेत्र अधिकाºयाने सूड उगवल्याचा आरोप वनरक्षकांनी केला आहे.
अकोल्याच्या दोन वनरक्षकांचे यवतमाळ सीसीएफ कार्यालयासमोर उपोषण
ठळक मुद्देतीन महिन्यांचे वेतन नाही : चोरीच्या लाकडांचा ट्रक पकडणे भोवले