शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शेती विकली, पण स्पर्धा परीक्षा दिलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:38 IST

तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय... घरी पाच बहिणी लग्नाच्या अन् वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला.. अशा अवस्थेत कोण खचणार नाही? तो खचला नाही. बहिणीचे लग्न केले. वडिलांचा उपचार केला अन् स्वत:ही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला.

ठळक मुद्देगरिबीवर मात : ‘क्लासेस’विना घाटंजी तालुक्यातील युवक झाला विक्रीकर निरीक्षक

सुधाकर अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय... घरी पाच बहिणी लग्नाच्या अन् वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला.. अशा अवस्थेत कोण खचणार नाही? तो खचला नाही. बहिणीचे लग्न केले. वडिलांचा उपचार केला अन् स्वत:ही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याचे नाव आकाश दत्ता जाधव. गरीब शेतकºयाचा हा मुलगा कोणत्याही ‘क्लासेस’विना विक्रीकर निरीक्षक बनला आहे.तालुक्यातील साखरा खुर्द हे आकाशचे गाव. घरी शेती आहे, पण शेतकºयांच्या पाचवीला पूजलेली गरिबीही आहे. सोबतीला पाच बहिणींच्या लग्नाची चिंता. पदवीपर्यंत शिकल्यावर स्पर्धा परीक्षा देण्याची आकाशची इच्छा असली तरी परिस्थिती नव्हती. एका मित्राने त्याला दर्यापूरला (जि. अमरावती) नेऊन त्याच्या अभ्यासाची व्यवस्था केली. पण त्याचवेळी मोठे संकट आले. मजुरी करून आकाशसाठी पैसे पाठविणारे वडीलच आजारी पडले. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आकाशसाठी हाच मोठा धक्का असताना वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसणे हे दुसरे संकटही उभे झाले. शेवटी अभ्यास थांबवला अन् शेती विकली. उपचार सुरू केला. दीड वर्षांनंतर वडीलांची प्रकृती थोडी सुधारली. ४ मे २०१४ रोजी एका बहिणीचे लग्न उरकल्यावर मात्र आकाश पुन्हा अभ्यासाकडे वळला.दररोज १० ते १२ तास अभ्यास करून अवघ्या सहा महिन्यातच एसटीआय पूर्व परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. पण मुख्य परीक्षेत एक गुण कमी मिळाल्याने तो अपात्र ठरला. त्यावेळी ‘क्लासेस’ लावल्याशिवाय यश अशक्य आहे, असे वाटू लागले. पण शिकवणीचा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे आपल्या अनुभवाचा, चुकांचा आधार घेत जोमाने अभ्यास सुरू केला. त्याचवेळी तो २०१६ च्या सप्टेंबरमध्ये तलाठी म्हणून परभणी येथे रूजू झाला. पण त्यात तो समाधानी नव्हता. पुन्हा एसटीआय परीक्षा दिली.डिसेंबरमध्ये लागलेल्या निकालात विमुक्त जाती वर्गवारीतून आकाशची अखेर विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली. या यशाचे श्रेय त्याने आपल्या आईवडीलांना आणि कष्टाळू बहिणींना समर्पित केले आहे.आकाश-अतुल बनले घाटंजी तालुक्याची शानघाटंजी तालुक्याला एसटीआय परीक्षेत यंदा दुहेरी यश मिळाले आहे. आकाश जाधवप्रमाणेच जुनोनी येथील अतुल वानखडे या तरुणानेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश मिळविले. आईचा मृत्यू पाहिलेल्या अतुलला काका, काकू यांच्या रूपाने मोठे प्रोत्साहन मिळाले. गरिबीवर मात करीत अतुल वानखडेदेखील विक्रीकर निरीक्षक बनले आहेत. या दोन्ही तरुणांच्या स्पर्धा परीक्षेतील यशाने तालुक्याची मान उंचावली आहे.