शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

शेतकऱ्यांनी शोधाला दुग्ध व्यवसायातून प्रगतीचा मार्ग

By admin | Updated: March 30, 2015 02:08 IST

पाच वर्षापूर्वी महागाव तालुक्यात दुधासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत होती. तालुक्यात कुठेही पुरेसे दूध उपलब्ध नव्हते.

महागाव : पाच वर्षापूर्वी महागाव तालुक्यात दुधासाठी शहराकडे धाव घ्यावी लागत होती. तालुक्यात कुठेही पुरेसे दूध उपलब्ध नव्हते. मात्र दुष्काळी परिस्थितीने शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले असून आता तालुक्यात दररोज ६० ते ७० हजार लिटर दूध उत्पादन होत आहे. खासगी कंपन्या ४० ते ६० रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करीत असल्याने अनेक जण दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे. महागाव तालुका हा सर्वस्वी कृषीवर अवलंबून असणारा तालुका आहे. मात्र गत काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ७५ हजार हेक्टर जमीन क्षेत्र असलेल्या या तालुक्यात ३० हजारावर शेतकरी आहे. केवळ शेती हाच एकमेव चरितार्थाचा व्यवसाय होता. कुणीही पूरक व्यवसायाकडे वळत नव्हता. त्यामुळे दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात जाणवत होती. परंतु अलिकडे दुष्काळानेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्यास भाग पाडले. शेतीचाच एक भाग असलेल्या दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी वळले. पंतप्रधान पॅकेज आणि इतर योजनांमधून शेतकऱ्यांनी गाई, म्हशी घेतल्या. आज तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे दोन-तीन दुधाळू जनावरे दिसत आहे. दुधातून प्रगती साधता येते हे लक्षात आल्यावर अनेकांंनी दुग्ध व्यवसायाकडे मोर्चा वळविला. तालुक्यात ६० ते ७० हजार लिटर दुधाचे उत्पादन दररोज होत आहे. शासकीय दर अत्यल्प असल्याने शेतकरी खासगी कंपन्यांना आपले दूध विकत आहे. जागेवर फॅट काढून या कंपन्या शेतकऱ्यांना ४० ते ६० रुपये भाव म्हशीच्या दुधाला तर गाईच्या दुधाला ३० ते ४५ रुपये भाव देत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडेच आकर्षित होत आहे. महागाव, फुलसावंगी, खडका, हिवरा, मुडाणा, अंबोडा, सवना आदी गावात दूध संकलन केंद्र सुरू झाले आहे. या ठिकाणी शेतकरी आपले दूध देत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी दुग्ध व्यवसायातून प्रगती साधत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आता जनावरांसाठी चारा उत्पादक सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)