लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : दिवाळी आटोपून १५ दिवस लोटले तरी अद्यापही कापसाचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे खासगी व्यापारी शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट करीत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदी केंद्रसुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नगदी पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या या पांढऱ्या सोन्याचे यंदा परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना सावकार व खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.दरवर्षी विजयादशमीला निघणारा कापूस यंदा पावसामुळे शेतकºयांच्या घरी उशिराने येत आहे. आपली गरज भागवण्यासाठी कास्तकार कापूस कमी भावात विकू लागले आहे. खासगी व्यापारी मात्र हा कापूस बेभाव गिळंकृत करीत असल्याने कापूस पणन महासंघाने व सीसीआयने खरेदी केंद्र सुरू करून शेतकºयांना न्याय देण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.यंदा महागाव तालुक्यात २५ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्हा हा कापसाचा जिल्हा म्हणून राज्यासह देशात ओळखला जातो. परंतु जिल्ह्यातील पांढरे सोने पिकविणारे शेतकरी सातत्याने या ना त्या कारणाने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. यंदा भलेही पावसाने उशिरा सुरवात केली होती; परंतु खरीप हंगाम चांगल्याप्रकारे दिसत असतानाच निसर्गाने पुन्हा हंगामावर पाणी फेरले. वैफल्यग्रस्त बळीराजा पुन्हा आस्मानी संकटाचा बळी ठरला आहे.वातावरण बदलामुळे कापसाचा भाव पाच हजार ते साडेपाच हजार यावर स्थिरावण्याची शक्यता आहे. शासनाने केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागतकापसाची खरेदी सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे. लवकरच कापूस खरेदीसंदर्भात कार्यवाही होणार आहे. यावर्षीची परिस्थिती पाहता पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.- अभिजित गुगळेसचिव, कृषी उत्पन्न बाजारसमिती महागाव
कापूस खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST
पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नगदी पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या या पांढऱ्या सोन्याचे यंदा परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कापूस खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
ठळक मुद्देकेंद्र सुरू करण्याची मागणी : महागाव तालुक्यात व्यापाऱ्यांकडून लूट