शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बैलजोडी काढली विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:42 IST

सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.

ठळक मुद्दे नापिकी, वैरणटंचाई : पाणी प्रश्नही झाला कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे.उमरखेड तालुका विदर्भाच्या टोकावर आहे. तालुक्यापासून मराठवाडा सीमा नजीक आहे. भौगोलिकदृष्ट्या हा तालुका व्यापक आहे. तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. त्यामुळे हा तालुका सुपिक म्हणून गणला जातो. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडली आहे. त्यातच सततच्या नापिकीमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. पावसाअभावी नेमके कोणते पीक घ्यावे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. ही सर्व मदार बैलजोडीवर अवलंबून असते. बैलजोडीशिवाय शेत कसणे शक्यच नाही. मशागत त्यांच्याच भरवशावर केली जाते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई आणि वैरणटंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. बळीराजाला तसेही दरवर्षी कोणत्या ना कोणत्या आपत्तीला तोंड द्यावेच लागत आहे. त्यात यंद बैरणटंचाई निर्माण झाल्याने नाईलाजास्तव त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली बैलजोडी विक्रीस काढावी लागत आहे. बैलजोडीसोबतच पाळीव जनावरे विकण्याची वेळ पशुपालकांवर ओढवली आहे. सध्या तालुक्यातील बैलबाजारात मोठ्या प्रमाणात बैलजोडी विक्रीस येत आहे.खरिपानंतर रबीतही पावसाचा फटकागेल्या खरीप हंगामानंतर रबीचा हंगामही अत्यल्प पावसातच गेला. त्यामुळे मुक्या जनांवराच्या पाण्यासह वैरणाचा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. स्वत: हालअपेष्टा भोगात आत्तापर्यंत अनेकांनी बैलजोडी आणि इतर पाळीव जनावरे पोसली. मात्र यावर्षीच्या उन्हाळ्यातील पाणी आणि वैरणटंचाईमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सतत संकटे येत असल्याने बळीराजा पुरता खचला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी