शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जळत्या उसाकडे पाहून शेतकरी मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:24 IST

उसाला लागलेली आग पाहून एका शेतकऱ्याच्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

यवतमाळ : नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे  शार्ट सर्कीटने चार एकर उसाच्या शेतीला आग लागली. या आगीत आठ लाखाचा ऊस जळून खाक झाला. दरम्यान नेर नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दोन तास उशिरा पोहोचल्याने याठिकाणी तणाव निर्माण झाला.  उसाला लागलेली आग पाहून एका शेतकऱ्याच्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

नेर तालूक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी रमेश नथ्थूजी दहेकार (वय ५५) यांनी शेतात चार एकर उसाची लागवड केली होती. सदर उसाची तोडणी २० नोव्हेंबरला होती. मात्र बुधवारी उसावरून गेलेल्या विद्युत वाहिनीचे स्पार्किंग झाल्याने ही आग लागली. यावेळी नेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचरण केले. अग्निशामक दल पोहोचल्यावर शेतात जाण्याकरीता योग्य रस्ता नसल्याने दोन तास खोळंबले. यामुळे शेतातील जमलेला जमाव संतप्त झाला. यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर अग्निशामक दल शेतात पोहोचले.  मात्र ऊस तोपर्यंत जळून खाक झाला होता.

उसाला लागलेली आग पाहून रमेश दहेलकर यांचा मुलगा सुजित दहेलकर याने शेतातच विष प्राषन केले. त्यानंतर त्याला तातडीने नेर शासकीय रुग्नालयात हलविण्यात आले. तेथून  यवतमाळ येथे वंसतराव नाईक शासकीय रूग्नालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.  ठाणेदार अनिल किनगे, जमादार राजेश चौधरी,  प्रदीप खडके हे परीस्थीवर नियंत्रन ठेऊन आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने मांगलादेवी परिसरात विद्युत मंडळ व अग्निशामक दल यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ