लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या तूर खरेदीची धोरणाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी आवाज उठवित जिल्हा कचेरीसमोर तूर जाळली. पाच दिवसात निर्णय न झाल्यास तूर बाजार समितीच्या यार्डात टाकण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी केली. यापैकी १५ हजार शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी झाली. २० हजार शेतकऱ्यांना अद्यापही तूर विकता आली नाही. यामुळे संघर्ष समितीच्या नेतृत्वात आंदोेलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घुगऱ्या शिजवून सरकारच्या नावाने वाटल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रवीण देशमुख यांनी केले. खासदार भावना गवळी उपस्थित होत्या. अशोक बोबडे, राहुल ठाकरे, बाळासाहेब मांगुळकर, अरूण राऊत, मनिष पाटील, बाबासाहेब गाडे पाटील, अनिल गायकवाड, प्रकाश मानकर, रवी ढोक, जाफर खान, बासीत खान, किरण कुमरे, धनराज चव्हाण, जयंत धोंगे, राजू माहुरे, बालू पाटील दरने, राजेंद्र गायकवाड, प्रकाश नवरंगे, पंढरी सिन्हे, आनंदराव जगताप, वासूदेव महल्ले, बालू काळे, रोहीत देशमुख, मिलिंद इंगोले, दीपक कदम, अशोक पाचोले, अनिल देशमुख, संजय ठाकरे, प्रकाश छाजेड, शशिकांत देशमुख, प्रकाश नवरंगे, बंडू कापसे, नरेंद्र कोंबे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीपुढे पेटविली तूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:11 IST
शासनाच्या तूर खरेदीची धोरणाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी आवाज उठवित जिल्हा कचेरीसमोर तूर जाळली. पाच दिवसात निर्णय न झाल्यास तूर बाजार समितीच्या यार्डात टाकण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीपुढे पेटविली तूर
ठळक मुद्देखरेदी करा : शेतकरी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा