शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात शेतकाऱ्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव; गळ्यात कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ घालून आंदाेलन

By सुरेंद्र राऊत | Updated: September 7, 2024 15:18 IST

गळ्यात कापूस-साेयाबीनची माळ : शेतमालाच्या भाववाढीची केली मागणी

यवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठाेड शहरातील समता मैदानात शनिवारी गणपती खरेदी करत असताना, त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. कापूस व साेयबीनचे भाव वाढविण्याची मागणी केली. या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून साेशल मिडियात शेतमालाच्या भाववाढीची माेहीम उघडली आहे. याअंतर्गतच शेतकऱ्यांनी कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ गळ्यात  घालून आंदाेलन केले.   

जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीसह अनेक नैसर्गिक संकटांनी त्रस्त झाला आहे. शासन अशाही स्थितीत शेतमालाचा भाव वाढवावा म्हणून प्रयत्न करताना दिसत नाही. शासानाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी साेशल मिडियावर माेहीम उघडली आहे. मंत्री संजय राठोड यांना घेरून सोयाबीन व कापूस पिकाच्या भाववाढी संदर्भात निर्दशने केली.  शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अशा पद्धतीची निदर्शने प्रदर्शने चालूच राहतील.अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मंत्री संजय राठाेड यांच्या समाेर व्यक्त केली. सोयाबीन-कापूस दरवाढ,पिकविमा,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १०० टक्के भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदेालन सुरू आहे.  या आंदाेलनाची सुरूवात काॅग्रेसच्या सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या आंदाेलनात शेतकरी प्रकाश कांबळे,अनिल चवरे,अभय अनासाने,अतुल झोपाटे,कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे,नरेश खोब्रागडे,सचिन मनवर यांच्यासह माेठ्यासंख्येने शेतकरी उपस्थित हाेते. 

शासनाला ११ सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम"जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही,त्यांच्या मागणीची पूर्तता होणार नाही,तोवर अशाच पद्धतीची प्रदर्शने,निदर्शने चालूच राहतील.येत्या ११ सप्टेंबर पर्यंत जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर जिल्ह्यात माेठे जन आंदोलन जिल्हाभर उभारण्यात येईल"- प्रा. पंढरी पाठे, शेतकरी नेते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनfarmingशेतीYavatmalयवतमाळSanjay Rathodसंजय राठोड