शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 21:54 IST

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्याकडे मदत वळती झाली. मात्र, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकार आंदोलनानंतर ग्रामसेवकांनी चार तालुक्यांमध्ये कामच केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी त्यांना आंदोलन करण्यासाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनावर संताप नोंदविला. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, घाटंजी आणि नेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची मदत गोळा झाली नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात ग्रामसेवकांनी कोऱ्या याद्या दिल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या चार तालुक्यांमध्ये पैसे वळते झालेच नाही. दोन दिवसांनंतर बँकांना सुट्ट्या आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसांत मदत गोळा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप समितीने केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासोबतच परतीच्या पावसानेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत दिवाळी तोंडावर असताना मदत मिळाली असतील तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र, तसे झाले नाही. यावर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, सुरेश चिंचोळकर, दत्तकुमार दरणे, आनंदराव जगताप, प्रा. घनश्याम दरणे, प्रा. विजय गाडगे, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, अरुण राऊत, अशोक बोबडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. मदत तातडीने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

शेतकऱ्यांना उभे राहायलाही जागा नाहीलोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. या आंदोलनात लक्ष वेधण्यासाठी जागाही असावी लागते. यवतमाळात आंदोलनासाठी जागाच नाही. तिरंगा चाैकात पार्किंगची व्यवस्था आहे तर आझाद मैदानात फटाक्याची दुकाने आहे. त्यामुळे बुधवारी शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर बसून आंदोलन केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती