घाटंजी तहसीलवर शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:30 PM2018-05-25T22:30:02+5:302018-05-25T22:30:02+5:30

तालुक्यात शेतकरी, अतिक्रमणधारक, बेरोजगार आणि नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मंगळवारी तहसीलवर धडक देण्यात आली.

Farmers hit Ghatanji tehsil | घाटंजी तहसीलवर शेतकऱ्यांची धडक

घाटंजी तहसीलवर शेतकऱ्यांची धडक

Next
ठळक मुद्देबेरोजगारही आक्रमक : दारिद्र्य रेषेखालील गरजूंना घरकूल, विहिरींना मान्यता द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यात शेतकरी, अतिक्रमणधारक, बेरोजगार आणि नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मंगळवारी तहसीलवर धडक देण्यात आली.
पंचायत समितीचे माजी सदस्य सहदेव राठोड यांच्या नेतृत्त्वात तालुक्यातील शेतकरी, अतिक्रमणधारक, बेरोजगार तहसीलवर धडकले. त्यांनी वनजमिनीवरील व गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना त्वरित पट्टे द्यावे, अतिवृष्टीने खचलेल्या व गाळाने भरलेल्या विहिरींना त्वरित प्रशासकीय मान्यता द्यावी, दारिद्र्य रेषेखालील कायम घरकूल यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, आर्थिक सर्वेक्षणातून सुटलेल्या बेघर गरजू लाभार्थ्यांना प्रपत्र ड मधील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, विमुक्त जाती भटक्या जमाती, गरजू बेघरांना यशवंतराव चव्हाण, मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ द्यावा, रमाई व शबरी योजनेची घरकुले मंजूर करावी आदी मागण्या केल्या.
जवळपास नऊ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सहदेव राठोड व मोर्चात सहभागी शेतकरी नागरिकांनी दिला.

Web Title: Farmers hit Ghatanji tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा