शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतकरी धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:02 IST

पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही.

ठळक मुद्दे२० हजार शेतकरी प्रतीक्षेत : खरीप तोंडावर येऊनही माफीच्या पैशाचा पत्ता नाही

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही. अखेर या शेतकऱ्यांना परत फिरावे लागले.बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा, कृष्णापूरच्या शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाले. मात्र वर्ष लोटले तरी अनेक शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे मिळाले नाही. आता तरी कर्ज द्या, असे म्हणत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या दिला. मात्र जिल्हाधिकारी हजर नसल्याने त्यांना दोन तास वाट पाहावी लागली.शंकर मेंढे यांचे २०१५ मध्ये घेतलेले कर्ज माफीला पात्र ठरले. याची रक्कमही जिल्हा बँकेकडे आली. पण परतावा जास्त अन् रक्कम कमी आहे, हे कारण सांगत कर्जाचे पैसे परत गेले. शंकर मेंढे यांचे ३५ हजारांचे कर्ज होते. तर राजू मेंढेचे ७४ हजार रूपयांचे कर्ज होते. या दोन्ही प्रकरणात मंजूर झालेली रक्कम कमी पडत आहे, असे सांगत पैसे परत गेले. सदानंद झांबरे यांनी २००८-०९ मध्ये ३२ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांचे नाव अद्यापही ‘ग्रीन लिस्ट’मध्ये आले नाही. दिवाकर भानस यांनी २००७-०८ मध्ये १५,७०० रूपयांचे तर वामन गुरनुले यांनी ३५ हजारांचे कर्ज घेतले होते. दिलीप डाखोरेकडे ५० हजार रूपयांचे कर्ज आहे. नलू गुरनुले, कमला रामगडे, चंद्रकला येंडे, सरस्वता गवत्रे हे जिल्हा बँक, ग्रामीण बँक आणि सेन्ट्रल बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत. बँक अधिकारी शेतकऱ्यांना सन्मान देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.तांत्रिक चुकांनी वाढली ‘यलो लिस्ट’बँक खाते क्रमांक चुकणे, आयएफएससी कोड नसणे, आधार नंबर चुकणे, बँक आणि शेतकºयांच्या रकमेत तफावत असणे अशा तांत्रिक कारणांमुळेही पात्र शेतकरी कर्जमाफीला मुकले आहेत. त्यांचा जिल्ह्यातील आकडा २० हजारांच्या जवळपास आहे. हे सर्व शेतकरी ‘यलो लिस्ट’मध्ये आहेत.‘यलो लिस्ट’मधील शेतकऱ्यांची माहिती बँकेने हब सेंटरला दुरुस्त करून पाठविली आहे. मात्र सुधारित यादी अजूनही आली नाही. या यादीत १५ ते २० हजार शेतकरी आहेत.- अरविंद देशपांडेसीईओ, जिल्हा बँक, यवतमाळ

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज