लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.पैनगंगा नदीला इसापूर धरणाचा तिसरा कालवा घोषित करून नदीपात्रात त्वरित पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकºयांनी १३ व्या दिवशी शासनाची तेरवी केली. सोमवारी १५ व्या दिवशी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात दफन आंदोलन केले. यापूर्वी धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी अगोदरच खोदलेल्या खड्ड्यात स्वत:ला दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने आंदोलकांनी ऐनवेळी दुसरीकडे खड्डा खोदून आंदोलन पूर्ण केले.प्रहारचे संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारचे नांदेड, हिमायतनगर, उमरखेड, हदगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी बंदोबस्त ठेवला. नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, एसडीपीओ अभय देशपांडे, पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे, पीएसआय सुशील चव्हाण, बनसोडे यांच्यासह इस्लामपूर, किनवट, हदगाव, मनाठा, तामसा आणि नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात होते.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशशेतकºयांचे आंदोलन लक्षात घेऊन यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सोमवारी पाटबंधारे विभागासोबत चर्चा केली. यानंतर नांदेड जिल्हाधिकाºयांनी सात तर यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी नदीपात्रात पाच दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा आदेश देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नदीत कधी पाणी येईल, याची शाश्वती नसल्याने आंदोलन सुरूच आहे.
चातारीत पैनगंगा नदीपात्रात शेतकऱ्यांचे दफन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:59 IST
गेल्या १५ दिवसांपासून बोरी-चातारी येथे नदीपात्रात आंदोलन करणाºया शेतकºयांनी सोमवारी दफन आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
चातारीत पैनगंगा नदीपात्रात शेतकऱ्यांचे दफन आंदोलन
ठळक मुद्देप्रशासनाची तारांबळ : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह प्रहारचा सहभाग