शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
8
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
9
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
10
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
11
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
12
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
13
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
14
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
15
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
16
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
17
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
18
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
19
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
20
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

शेतकऱ्यांच्या नजरा आता पीक विम्याकडे

By admin | Updated: May 19, 2016 02:05 IST

शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे़ पेरणी पाण्याचे दिवस जवळ येत आहे़ यावर्षी कपासी व इतर शेतमालाचे भाव कमालीचे अस्थिर होते.

कळंब तालुका : खरीप हंगामासाठी पैशांची केली जात आहे जुळवाजुळवकळंब : शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे़ पेरणी पाण्याचे दिवस जवळ येत आहे़ यावर्षी कपासी व इतर शेतमालाचे भाव कमालीचे अस्थिर होते. या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली़ उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसविताना गाठीशी एकही पैसा शिल्लक राहिलेला नाही़, ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पीक विम्याच्या रकमेसाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे़ यावर्षी ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांनाही मदत देणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे, हे विशेष. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याकडे लागल्या आहे.शासन शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवित असल्याचा आव आणते़ असे असले तरी, शासनाच्या योजना व नीती या शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या असतात, असा आरोप नेहमीच केला जातो़ या आरोपात तसे पाहिले तर तथ्य आढळून येते़ कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कापसाच्या निर्यातीसंदर्भात शासनाने धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरलेले आहे़ शेती व्यवसाय हा आता फायद्याचा राहिलेला नाही, अशी बोंब वारंवार केली जाते़ उत्पादीत खर्चाच्या आधारावर शेतमालाला जोपर्यंत भाव मिळत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे़ यावर्षी बेभरवशाचा पाणी व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. सद्यस्थितीत शेतमालाचे बाजारमूल्यही घसरलेले आहे़ आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांची आशा आता शासनाच्या पीक विम्यावरच एकवटली आहे़ शेती करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करणे, हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजले आहे. बँका पाहिजे तेव्हा व पाहिजे तेवढे कर्ज उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर नाईलाजाने सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येते़ शेवटी कर्जाच्या खाईत लोटलेला शेतकरी उत्पन्न न झाल्याने हवालदिल होतो़ त्यातच तो आपली जीवनयात्रा संपवितो़ अशी उदाहरणेही कळंब तालुक्यात कमी नाही़ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या कळंब तालुक्यात झालेल्या आहेत़ अशा परिस्थितीत पीक विमा तरी तत्काळ पदरात पडेल का, हा खचलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे़ दुसरीकडे ज्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशानाही मदत देण्याची घोषणा शासनाने केली. परंतु अजुनपर्यंतही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. यासंदर्भात तहसीलदार संतोष काकडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी यासंदर्भात शासनाकडून कुठलीच माहिती आलेली नाही, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)