शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

शेतकऱ्यांचा दसरा झाला कडवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतर खरिपातील उर्वरित सोयाबीन काढण्याची तयारी सुरू असताना तालुक्यात परतीच्या पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पीक काढणीत व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षीचा दसरा शेतकऱ्यांचा गोड होण्याऐवजी कडवट झाला आहे. सध्या ढगाळी वातावरण कायम आहे. शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळात अश्रू तरळताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकरी आधीच हवालदिल झाले. आता ऐन दसरा सणाच्या मध्यरात्रीपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा दसरा कडवट झाला आहे.अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतर खरिपातील उर्वरित सोयाबीन काढण्याची तयारी सुरू असताना तालुक्यात परतीच्या पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पीक काढणीत व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षीचा दसरा शेतकऱ्यांचा गोड होण्याऐवजी कडवट झाला आहे.सध्या ढगाळी वातावरण कायम आहे. शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळात अश्रू तरळताना दिसत आहे. आधीच अतिवृष्टीतील सानुग्रह अनुदान अद्यापही मिळाले नाही. आता परतीचा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. मायबाप सरकारने या गंभीर समस्येची दखल घेऊन आता तरी तातडीने मदत द्यावी, अशी अपेक्षा पुरस्कार प्राप्त शेतकरी अशोक वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे. 

महागाव तालुक्यालाही झोडपले, शनिवारी दिवसभर पावसाची हजेरी

महागाव : शहरासह तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात गंजी मारून ठेवलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकरी दसरा सणात व्यस्त असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. अनेकांना रात्रीच उठून शेत गाठावे लागले. अनेक शेतकरी पहाटेपर्यंत सोयाबीन झाकण्यासाठी धडपड करताना दिसत होते. शनिवारीसुद्धा शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसामुळे कपाशीसुद्धा ओली झाली. त्यामुळे कपाशीच्या दर्जात फरक पडण्याची भीती सतावत आहे. परिणामी दरही कमी मिळण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस