शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:16 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला.

ठळक मुद्देपुसदमध्ये व्याख्यान : सोमवारची सायकल रॅली आणि शोभायात्रा रद्द, शहिदांना वाहणार श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला. स्वराज्यात शेतकरी समृद्ध, तर सामान्य माणूस आनंदाने नांदत होता. सर्वधर्माचा आदर करणाºया स्वराज्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही, हेच शिवरायांच्या इतिहासातील वास्तव असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी केले.येथील छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीतर्फे शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंगमधील राजमाता जिजाऊ परिसरात आयोजित ‘शिवपर्व-२०१९’ व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजे-इतिहासातील वास्तव’ या विषयावरील पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर होते. जगतगुरु संत तुकाराम महाराज विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर देशमुख, प्रा.संजय खुपासे, राजेश साळुंके, बाळासाहेब साबळे, दिगांबर जगताप, अशोक बाबा, प्रा.पंडित देशमुख, प्रवीण कदम आदी उपस्थित होते.प्रथम आसावरी पवार या चिमुकलीने ‘जिजाऊ वंदना’ सादर केली. साची ठाकरे हिने ‘मी जिजाऊ बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग, तर चिन्मय कदम याने शिव चरित्रावर प्रभावी भाषण दिले. अध्यक्षीय समारोप करताना राम देवसरकर यांनी विविध क्षेत्रात बहुजन तरुणांनी उंच भरारी मारण्याचे आवाहन केले. संचालन शशिकांत जामगडे, तर प्रा.गजानन जाधव यांनी आभार मानले. यावेळी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, प्रा. प्रकाश लामणे, यशवंत चौधरी, राजेंद्र भिताडे, साकिब शहा, प्रभाकर टेटर, नितीन पवार, सुशांत महल्ले, हरिभाऊ ठाकरे आदी उपस्थित होते. शहर व परिसरातील शिवप्रेमींनी गर्दी केली होती.सोमवारी वावगे यांचा कार्यक्रमशिवपर्व-२०१९ मध्ये सोमवार, १८ फेब्रुवारीला प्रशांत वावगे व रश्मी वावगे यांचा ‘मी छत्रपती शिवाजी होणारच’ या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी विशेष प्रेरणादायी कार्यक्रम होणार आहे. मात्र छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीने सोमवारी आयोजित सायकल रॅली व शोभायात्रा रद्द केली आहे. त्याऐवजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवराय यांचे पूजन व शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज