शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कापसाचा पैसा कोंबडबाजारात

By admin | Updated: December 1, 2014 23:00 IST

पोलीस प्रशासनाच्या मेहरबानीने जिल्हाभर अवैध व्यवसायांची खुलेआम दुकाने सुरू झाली आहेत. या दुकानांमधील कोंबडबाजारात शेतकऱ्यांचा कापसाचा पैसाही बुडतो आहे.

यवतमाळ : पोलीस प्रशासनाच्या मेहरबानीने जिल्हाभर अवैध व्यवसायांची खुलेआम दुकाने सुरू झाली आहेत. या दुकानांमधील कोंबडबाजारात शेतकऱ्यांचा कापसाचा पैसाही बुडतो आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आधीच नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहेत. शेतकऱ्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन हातचे गेलेल्या शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता. मात्र कापसाचे सरासरी उत्पन्न घटले आहे. त्यातही आहे तो कापसाचा पैसाही शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाताना दिसत नाही. त्यासाठी अवैध धंद्यांचे खुले काऊंटर कारणीभूत ठरले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात दारू, जुगार, मटका, सट्टापट्टी, कोंबडबाजार या सारखे अवैध धंदे चोरट्या मार्गाने सुरू होते. या धंदेवाईकांना हप्ते देऊनही पोलिसांची भीती होती. कारण हप्त्याचे केवळ लोकल कनेक्शन होते. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातून कोणत्याही क्षणी धाड पडण्याच्या भीतीने हे धंदे आतल्या आत चालविले जात होते. परंतु विधानसभेची निवडणूक पार पडताच हे सर्व धंदे रस्त्यावर आले आहे. त्यांची संख्या आणि त्यातील आर्थिक उलाढाल चौपटीने वाढली आहे. या धंद्यांना पोलीस प्रशासनाचेच अभय असल्याचे सांगितले जाते. या सर्व आर्थिक उलाढालीचे केंद्र बिंदू वणीतील वाहतूक शाखेत एकवटले असल्याची माहिती आहे. तेथूनच या उलाढालीतील लाभाचे पाट यवतमाळपर्यंत वाहत आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या व्यवसायात सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात लुटला जात आहे. सध्या शेतकऱ्यांचा हंगाम आहे. कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. विक्रीसाठी कापूस बाजार समितीत, व्यापाऱ्याकडे आणल्यानंतर हाती आलेला पैसा शेतकरी घरी घेऊन जाण्याआधी वाटेतच दारू, जुगार, कोंबडबाजाराचे काऊंटर त्याला अडथळा निर्माण करीत आहे. शेतकऱ्यांचा कापसाचा बहुतांश पैसा हा कोंबडबाजारात जाताना दिसत आहे. जिल्ह्यात सर्वच भागात कोंबडबाजार चालविले जात असले तरी त्याची सर्वाधिक संख्या आणि उलाढाल ही वणी व पांढरकवडा विभागात असल्याची माहिती आहे. शिबला, झरी, करंजी, बोटोणी, देवधरी घाट, आंबेझरी, मोवाडा, शिरपूर, पुनवट, निलजई, दारव्हा, लाडखेड, मुकुटबन, रुईवाई जंगल, पारवा जंगल, अर्ली जंगल या भागात मोठ्या प्रमाणात कोंबडबाजार सुरू आहे. लहानात लहान कोंबडबाजाराची उलाढाल ही तीन ते चार लाख रुपयांच्या घरात आहे. तेथून पोलिसांना मिळणारा हप्ताही ७० ते ८० हजाराच्या आसपास असल्याचे बोलले जाते. झरी, वणी, पांढरकवडा, मारेगाव, घाटंजी, राळेगाव या पाच-सहा तालुक्यांमध्येच ५० ते ६० कोंबडबाजार असल्याचे सांगितले जाते. या कोंबडबाजार असलेल्या ठिकाणी दारू, नाश्ता व इतरही सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कोंबडबाजार सहसा जंगलात चालविला जातो. तेथे पोलीस सहजासहजी पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली जाते. मात्र हप्त्याच्या माध्यमातून मिलीभगत असल्याने पोलिसांचा या कोंबडबाजारावर धाड घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोंबडबाजारात मोठी गुंतवणूक केली जाते. तेथे एका वेळी ५० हजार ते एक लाखापर्यंत बोली लावली जाते. जिल्ह्यातील हे कोंबडबाजार व मटका-जुगार अड्डे सध्या कापसाचा पैसा खिशात घेऊन घराकडे निघालेल्या शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. त्यासाठी विशिष्ट एजंट शेतकऱ्यांना या धंद्यांकडे नेण्यासाठी नेमले गेले आहे. त्या धंद्यावर शेतकरी गेल्यानंतर त्याची खिशातील पैसा संपेपर्यंत सरबराई केली जाते. याच माध्यमातून कापूस उत्पादक शेतकरी लुटला जात आहे. आधीच दुष्काळात असलेल्या शेतकऱ्याचा कापसाचा पैसा घरी जाऊ नये, अशी खबरदारीच जणू या अवैध धंदेवाल्यांनी घेतल्याचे दिसून येते. त्यासाठी या शेतकऱ्यांना विशिष्ट पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढले जात आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे दरही चौपट झाले आहे. गेल्या कित्येक दिवसात पोलिसांनी कोंबडबाजारावर धाड मारल्याची नोंद नाही. यावरून पोलीस व कोंबडबाजाराची मिलीभगत सिद्ध होते. (जिल्हा प्रतिनिधी)