शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांची संमती बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 13:56 IST

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले होते. आता सहकार विभागाने कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देसरसकट पुनर्गठनावर निर्बंध अनेक शेतकरी कर्जमाफीला मुकल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले होते. आता सहकार विभागाने कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्याचे आदेश दिले आहे.कर्ज पुनर्गठनानंतर थकीत कर्ज असतानाही नवीन कर्ज मिळते. मात्र त्याचा व्याज दर जादा राहणार आहे. या पुनर्गठित कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना पाच वर्षांत करावी लागणार आहे. ही परतफेड जादा व्याज दरामुळे अवघड आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज पुनर्गठनाच्या प्रक्रियेत सक्ती न करण्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे राज्य शासनाच्या सहकार विभागाने कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्याचे आदेश दिले आहे.दुष्काळी भागात कर्ज पुनर्गठनाच्या आदेशासोबत शेतकऱ्यांची संमतीही आता बंधनकारक करण्यात आली. त्या दृष्टीने ३० जूननंतर प्रक्रिया राबविण्याच्या सूचना बँकांना होत्या. प्रत्यक्षात मुदतीनंतर महिनाभराचा कालावधी संपला तरी बँकांनी कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली नाही. यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. जे शेतकरी कर्ज पुनर्गठणासाठी तयार आहे, अशांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वितरित करण्यास तयार नाही. त्यांना शेतकरी कर्जाची परतफेड करेल किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.कर्ज पुनर्गठन प्रक्रियेत प्रथम कर्ज कायम असताना दुसरे कर्ज सतबारावर चढवावे लागते. यामुळे एकाच सातबारावर दोन कर्ज येतात. पहिलेचे कर्ज बाकी असताना नवीन कर्ज शेतकरी फेडणार नाही, अशी भीती बँकांना वाटत आहे. यामुळे बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना पुनर्गठन करू नका, असा सल्ला देतात. आवशकता असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्ज देत नाही. यातून बँकाचा एनपीए वाढण्याची शक्यता आहे. वसुली थांबल्याने व्यवस्थापकांना आपला शेरा खराब होण्याची धास्ती असते. यातून व्यवस्थापक अग्रणी बँकेकडून कर्जाच्या सूचना नसल्याचे सांगून ते मोकळे होतात. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात. हा प्रकार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांवर केंद्र शासनाने अद्याप अंकुश लावला नाही.कर्जमाफीतील पुनर्गठनाचे हप्ते अडकलेराज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत पुनर्गठित कर्जाचे शेतकरीही आहे. त्यांना परतफेडीसाठी पाच वर्षांचा कालावधी होता. मात्र कर्जमाफी अध्यादेशाच्या मुदतीच्या बाहेर ते गेले आहेत. यामुळे असे शेतकरी कर्जमाफीत बसले तरी थकीत सभासद म्हणूनच नोंदविले गेले. त्यांचे अनेक हप्ते मुदतीच्या बाहेरचे आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जाचा पेच पुनर्गठनामुळे वाढला आहे.

टॅग्स :agricultureशेती