शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

शेतकऱ्यांनी ठोकला वितरणवर एक कोटींचा दावा

By admin | Updated: December 20, 2014 02:13 IST

वीज वितरण कंपनीच्या कारभाराने त्रस्त आणि खंडित वीज पुरवठ्याने नुकसान सोसणाऱ्या महागाव तालुक्यातील अनंतवाडी येथील नऊ शेतकऱ्यांनी ...

विजय बोंपीलवार हिवरासंगमवीज वितरण कंपनीच्या कारभाराने त्रस्त आणि खंडित वीज पुरवठ्याने नुकसान सोसणाऱ्या महागाव तालुक्यातील अनंतवाडी येथील नऊ शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरुद्ध एक कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचमध्ये दाखल केलेल्या या तक्रारीने एकच खळबळ उडाली आहे. महागाव तालुक्यातील अनंतवाडी आणि कवठा या गावातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. अनेक कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून जोडणी घेतली आहे. परंतु मे २०१४ पासून वीज पुरवठा खंडित आहे. याबाबत विचारणा केली तर डीपी जळाल्यामुळे वीज वितरण खंडित असल्याचे सांगितले जाते. या कालावधीत शेतकऱ्यांना ओलितासाठी विजेची आवश्यकता होती. अनेक शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व कपाशीची लागवड केली होती. परंतु ओलिताअभावी नऊ शेतकऱ्यांचे सुमारे प्रत्येकी एक लाख रुपये नुकसान झाले आहे. तक्रारकर्ते हे सधन शेतकरी असून ओलिताच्या माध्यमातून दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न काढतात. परंतु वीज वितरणच्या निष्काळीपणामुळे त्यांना याला मुकावे लागले. याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला सूचना दिली. निवेदन दिले परंतु त्यानंतरही नादुरुस्त डीपी दुरुस्त झाली नाही. शेवटी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात दावा दाखल केला. मारोतराव शेळके, बाळासाहेब मुधोळ, दौलतराव भारती, राजकमल गिरी, किसन मांगधरे, भाऊराव जगदाडे, नारायण भारती, रेखाताई मुधोळ, वसंता कदम यांनी हा दावा दाखल केला आहे. पुसद येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ नुसार हा अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.