शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विमा अनुदानासाठी शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:21 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडवणूक केली जात आहे. २०१७-१८ मधील खरीप पिकांचे विमा अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. परिणामी बँकेबाबत असंतोष पसरला आहे. तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपुसद एसडीओंकडे धाव : रिपाइंच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडवणूक केली जात आहे. २०१७-१८ मधील खरीप पिकांचे विमा अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. परिणामी बँकेबाबत असंतोष पसरला आहे. तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पीक विमा अनुदानाबाबत अनेक शेतकºयांनी तक्रारी केल्यानंतर येथील रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आ) आक्रमक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात रिपाइंने सोमवारी येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना निवेदन दिले.पुसद तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची पुसद शाखा वगळता इतर राष्ट्रीयकृत बँकांनी महिनाभरापूर्वीच शेतकºयांना खरीप पीक विमा अनुदान वाटप केले. मात्र शेतकऱ्यांची बॅक असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद शाखेने अद्यापही अनुदान वाटप केलेले नाही. २०१७-१८ चा सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, मूग आदी पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा अनुदान अद्यापही जिल्हा बँकेने वाटप केलेले नाही.तालुक्यातील शेतकरी जिल्हा बँकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे आणखी संकटात सापडला आहे. त्यामुळे बँकेविरुद्ध असंतोष खदखदत आहे. खरीप पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिपाइंने दिला आहे.निवेदनावर बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, प्रकाश धुळे, प्रकाश खंडागळे, गौतम रणवीर, दिलीप धुळे, राजेश ढोले, पंडित बैस, वामन भालेराव, सुधीर कांबळे, संतोष डोंगरे, वसंता वाघमारे, बाबूलाल राठोड आदींच्या स्वाक्षºया आहेत.जिल्हा बँकेवर रोषतालुक्यातील इतर राष्टÑीयकृत बँकांच्या शाखांनी खरीप पीक विम्याचे अनुदान शेतकºयांना मागील महिन्यातच अदा केले आहे. परंतु खास शेतकºयांचीच बँक असलेल्या जिल्हा बँकेच्या पुसद शाखेला अद्यापही अनुदान वाटप करता आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये जिल्हा बँकेविरुद्ध रोष आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा