शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वाळलेले पीक घेऊन शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By admin | Updated: October 20, 2015 03:12 IST

शेतातील वाळलेले उभे पीक उपटून बैलबंडीत भरून तालुक्यातील शेतकरी सोमवारी स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले.

घाटंजी : शेतातील वाळलेले उभे पीक उपटून बैलबंडीत भरून तालुक्यातील शेतकरी सोमवारी स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले. लोकजागृती मंचच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा पुढचे पाऊल जिल्हा कचेरीवर धडकून तिथे शेतकरी मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा या मोर्चाचे नेतृत्त्व करणारे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी यावेळी दिला. जगाचा पोशिंदा शेतकरी पण, तोच उपाशी राहतो, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्याच्या मदतीला सरकार धावत नाही. नाशिकमध्ये शाही स्नानासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, पण हजारो लिटर पाणी शाही स्नानाला दिले जाते. हा विरोधाभास का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. अस्तित्वातील धरणाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही. पण, दुसरे धरण बांधून जलक्रांतीची भाषा काही लोक करतात, असे मत पवार यांनी मांडले. पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, शालिक चवरडोल आदींनी विचार मांडले. तहसीलदार एम.एम. जोरवर यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, वास्तव पीक पैसेवारी काढा, कर्जमुक्ती, पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २० हजार रुपये मदत द्या, घाटंजी येथे सीसीआयची कापूस खरेदी, नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी, भारनियमन बंद करा, अस्तित्वातील प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी द्या, सन २०१२ मधील महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.सभापती शैलेश इंगोले यांच्या निवासस्थानाहून मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. यावेळी ठाणेदार शिवा ठाकूर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (लोकमत चमू)