शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुसद खविसंच्या प्रभारी व्यवस्थापकावर शेतकऱ्यांचा रोष

By admin | Updated: August 15, 2016 01:26 IST

येथील खरेदी विक्री संघाचे प्रभारी व्यवस्थापक म.रा.राठोड हे शैक्षणिकदृष्ट्या अपात्र असल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुसद : येथील खरेदी विक्री संघाचे प्रभारी व्यवस्थापक म.रा.राठोड हे शैक्षणिकदृष्ट्या अपात्र असल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आॅडीट रिपोर्टमध्ये राठोड पदावर कार्यरत असल्याबाबत ताशेरे ओढण्यात आले आहे. त्यांना दिलेले वेतनही नियमबाह्य असून वेतनाची रक्कम वसुलपात्र असल्याचे नमूद आहे. या विषयी अनेक तक्रारी येत असून सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी, पणन संचालक, विभागीय सहनिबंधक, उपनिबंधक यांनी पुसद खरेदी विक्री संघाचे प्रभारी व्यवस्थापक यांच्या विरुद्ध कारवाईचे निर्देश दिले. तरीसुद्धा कारवाई करण्यात आली नाही. याबाबत वसंतनगर पोलीस ठाण्यात आणि सहायक निबंधक सहकारी संस्था पुसद यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आली आहे. १४ आॅगस्टपूर्वी राठोड यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यास विभागीय व न्यायालयीन कारवाई सुरू करण्याचा इशारा सभासद शेतकरी नारायण अंभोरे, ज्ञानेश्वर तडसे, नारायण पुलाते, अ‍ॅड. सचिन नाईक, अ‍ॅड. गजानन देशमुख, अ‍ॅड. चंद्रशेखर शिंदे, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, दिलीप पोले, अ‍ॅड. गजानन साखरे, अशोक चव्हाण आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)