शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:25 IST

मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देकर्जाची प्रतीक्षाच तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे नाही

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची प्रतीक्षा कायम असून तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडले नाही.शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा गत पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ झेलत आहे. गतवर्षी अपुऱ्या पावसाने कोरडा दुष्काळ पडला. यातून सावरत नाही तोच कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट आले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्यावर आले. त्यातच बाजारपेठेत हमी भावापेक्षाही कमी किंमतीत धान्य माल विकावा लागला. आता तर विकलेल्या तूर आणि हरभऱ्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत विमा मदतीला धावून येईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्याचेही पैसे आले नाही. अशा चिंताग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आशा आहे ती कर्जमाफीनंतर मिळणाऱ्या नवीन पीक कर्जाची. परंतु विविध अडचणीमुळे आजही शेतकऱ्यांच्या हाती कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेला दोन हजार कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले. जिल्हा बँकेने आतापर्यंत ३३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज दिले. शासनाने अर्ज द्या, कर्ज घ्या ही योजना सुरू केली. परंतु यातही अनंत अडचणी आहेत.अशातच हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अंदाज वर्तविले. अंदामाननंतर मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये धडकणार आणि कोकण मार्गे तो विदर्भात येणार. या सकारात्मक अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या अंगी हत्तीचे बळ संचारले. उधार उसणवार करून शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत केली. त्यातच इंधन दरवाढीने मशागतीचा खर्च हाताबाहेर गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांजवळ आता पैसाच उरला नाही. जिल्ह्यात चार लाख शेतकरी असून नऊ लाख १४ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पेरणीसाठी पैसा नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यातच शासनाने बियाणे कंपन्यांवर अनेक अटी टाकल्या. त्यामुळे सध्याही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. १५ मेपर्यंत बियाणे येणार असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. २५ मेपर्यंतही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. पाऊस वेळेवर आला तर एकाच वेळी बियाणे खरेदीमुळे गोंधळ उडून शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा बोगस बियाणे मारण्याची शक्यता आहे. अशा या विपरित परिस्थितीत शेती पडिक तर राहणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.शेतकऱ्यांची धूळ पेरणीकडे पाठजिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी केली जाते. पावसापूर्वी पेरणी करून पावसाची प्रतीक्षा शेतकरी करतात. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी ओलितही करतात. मात्र यावर्षी जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने धूळ पेरणीची हिंमत केली नाही. गतवर्षी बोगस बियाण्यांमुळे गुलाबी बोंडअळीचा फटका बसला. तसेच आता मार्केटमध्येही बियाणे उपलब्ध झाले नाही. परिणामी जिल्ह्यात कोणत्याही शेतकऱ्याने धूळ पेरणी केली नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

टॅग्स :Farmerशेतकरी