शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी केले मटक्याचे स्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:03 IST

जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग ऑपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले.

ठळक मुद्देपांढरकवडा येथील प्रकार किशोर तिवारी समोरच जुगाराचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग ऑपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. आठवडीबाजारात खुलेआम मटका जुगार सुरू होता. राज्यमंत्री दर्जाची व्यक्ती आपल्या बाजूला बसून आहे, याचीही जाणीव जुगाऱ्यांना नव्हती.जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या आर्थिक अडचणीत मटका व जुगार भर घालत आहे. यामुळेच अनेक जण आत्महत्येकडे वळतात. नेमका काय प्रकार आहे याचा छडा लावण्यासाठी खुद्द किशोर तिवारी यांनी स्वत: स्टिंग ऑपरेशन केले. पांढरकवडा येथील आठवडी बाजार परिसरात खुलेआम मटका, जुगार आणि चेंगळ हा प्रकार सुरू होता. अनेक जण पैसे लावण्यासाठी गर्दी करून होते. या गर्दीतच किशोर तिवारी स्वत: डाव लावणाऱ्याच्या बाजूला बसले. पोलिसांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कष्टाने कमावलेला पैसा या जुगारात उधळला जातो. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याचे तिवारी म्हणाले.मटका, जुगाराला स्थानिक आमदाराचा आशीर्वादकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा मतदारसंघात पांढरकवडा शहर येते. मंत्र्यांनी स्थानिक पोलिसांना मटका, जुगार हद्दपार करण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा मटका, जुगार आढळल्यास उपमहासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. मात्र त्यानंतरही सर्वत्र खुलेआम मटका जुगार सुरू आहे. पांढरकवड्यात तर स्थानिक आमदाराने मटका जुगाऱ्यांची बैठक घेऊन धंदा सुरू करण्यास सांगितल्याचा आरोप तिवारी यांनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी