शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतक-याचा पाच तास झाडावर ठिय्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:55 IST

सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे, रविवारी सकाळी एका शेतक-याने झाडावर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले.

हिवरी (यवतमाळ) : सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे, रविवारी सकाळी एका शेतक-याने झाडावर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने दाद दिली नाही. पत्नीने समजूत काढल्यानंतर मात्र तो खाली उतरला.धनंजय राजेंद्र वानखेडे (३८) असे या शेतक-याचे नाव असून, तो दारव्हा तालुक्यातील शेंद्री डोल्हारी येथील रहिवासी आहे. या वर्षी त्याने अर्जुना येथे मक्त्याने शेत घेतले आहे. सकाळी १०च्या सुमारास तो काही महिलांसह शेतात पोहोचला. शेतातील मोठ्या झाडाला ‘आमरण उपोषण’ असे फलक बांधले आणि झाडावर चढला. सोबतच्या महिलांनी यवतमाळ-आर्णी मार्गावरील वाहतूक रोखून धरली. आपल्या मागण्यांची चिठ्ठी त्याने झाडावरून खाली फेकली. त्यात आमरण उपोषण, सातबारा कोरा करा, दहा हजार रुपये तत्काळ द्या, फवारणीच्या विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतक-यांचे पुनर्वसन करा, असे लिहिले होते.या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार संजय डहाके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. काही वेळात नायब तहसीलदार नरेंद्र थुटे, मंडळ अधिकारी गुल्हाने त्या ठिकाणी आले. रुग्णवाहिका, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. धनंजयला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु तो कुणाचेही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हता. कुणी वर चढल्यास मी झाडावरून उडी मारेन, असे तो सांगत होता.धनंजयची पत्नी सावित्री हिने त्याचे मन वळवले, तसेच प्रशासनानेही सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, दुपारी २च्या सुमारास धनंजय खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.गतवर्षी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी फायनान्स कंपनीविरोधात आंदोलन करीत धनंजयने विषप्राशन केले होते, तर यापूर्वी एका मोबाइल टॉवरवर चढूनही आंदोलन केले होते.रविवारी झाडावर चढताना त्याने सोबत विषाची बाटली नेल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली होती, पण कोणतेही अघटित न घडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार