शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नाईलाजाने पुन्हा सावकाराच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी बँकांनी पत पुरवठा करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले. बँकर्स कमिटीने त्या दृष्टीने वाढीव कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने निर्णय घेतला. आरबीआयने राज्य शासनामुळे उद्देशालाच खिळ घातली आहे. यामुळे कर्जमुक्तीस पात्र ठरलेले एक लाखावर शेतकरी नव्या कर्जाला अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थकबाकीमुळे बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला आहे. हे सर्व शेतकरी कर्ज माफीवर अवलंबून होते.

ठळक मुद्देबँकांनी हात झटकले : गहाण ठेवायला शेती हाच एकमेव पर्याय, व्याज दरही अव्वाच्या सव्वा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे मान्सूनने जिल्ह्यात धडक दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाकरिता सावकाराच्या दारात धाव घेतली आहे. मात्र सावकारांनी तारणाशिवाय कर्ज देण्यास नकार दिला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. शेती गहाणात ठेवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला आहे.सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी बँकांनी पत पुरवठा करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले. बँकर्स कमिटीने त्या दृष्टीने वाढीव कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने निर्णय घेतला. आरबीआयने राज्य शासनामुळे उद्देशालाच खिळ घातली आहे. यामुळे कर्जमुक्तीस पात्र ठरलेले एक लाखावर शेतकरी नव्या कर्जाला अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थकबाकीमुळे बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला आहे. हे सर्व शेतकरी कर्ज माफीवर अवलंबून होते.आता पाऊस बरसल्याने शेतकरी बेचैन झाले आहे. खिशात पैसे नसल्याने या शेतकऱ्यांना उधारीवर खत आणि बियाणे देण्यास कृषीसेवा केंद्र चालक नकार देत आहेत. यामुळे कर्जाची तजविज करण्यासाठी शेतकरी सावकाराकडे गेले आहेत. काहींनी सौभाग्याचे लेणे सावकाराकडे गहाणात ठेवले आहे. तर अनेकांकडे गहाण ठेवायला सोनेही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर शेतीच गहाणात ठेवण्याची वेळ आली आहे.अधिकृत सावकारांनी कर्ज वितरणाचा बिगर शेतकऱ्यांना व्याजदर १५ ते १८ टक्के ठेवला आहे. तर शेतकऱ्यांना तारण असेल तर ९ टक्के आणि तारण नसेल तर १३ टक्के व्याजदर आहे.हा व्याजदर शेतकऱ्यांना मिळणारे संपूर्ण उत्पन्न फस्त करणारा आहे. यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. शेतीही गहाणात ठेवण्याची वेळ ओढवली आहे.जिल्ह्यात केवळ ११३ अधिकृत सावकारजिल्ह्यात अधिकृत सावकारांची संख्या ११३ आहे. तर अनधिकृत सावकारांचा आकडा यापेक्षा अधिक पटीने मोठा आहे. त्यांचे वाटपही मोठे आहे. अधिकृत सावकार चार कोटींचे कर्ज वाटप करतात. यामध्ये शेतकरी आणि बिगर शेतकºयांचा समावेश असतो. यावर्षी हा कोटा शेतकरीच पूर्ण करतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज