शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये निरोप समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:15 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते.प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, विभाग प्रमुख डॉ. आर.एस. तत्त्ववादी, प्रा. जी.एस. काकड, डॉ. पी.एम. पंडित, प्रा. जे.एच. सातुरवार, डॉ. ए.डी. राऊत, समन्वयक प्रा. ए.डी. पारडे, स्टुडंट कोआॅर्डिनेटर डॉ. यू.व्ही. कोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते.अभियंता सकारात्मक मार्गाने स्वत:ची व समाजाची दिशा बदलवू शकतो. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी चांगला समाज घडविण्यासाठी वाटचाल करावी, जिद्द व चिकाटीने समाजाला पुढे घेऊन जावे. रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन किशोर दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.विद्यार्थी प्रमुख नितेश धैर्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा उत्कृष्ट महाविद्यालयात उपयोगात आणल्याचे त्याने सांगितले. व्यक्तिमत्व विकास, सहअभ्यासी व इतर अभ्यासी तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण महाविद्यालयामध्ये आहे. त्याचा पुरेपूर उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे तो म्हणाला.प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर म्हणाले, महाविद्यालयातील अभ्यासू वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला वाव मिळतो. यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात. यावर्षी सर्व विभागातील सुमारे २३२ विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित कंपनीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी परडखे व सौरभ जिरापुरे यांनी केले. आभार समन्वयक प्रा. ए.पी. पारडे यांनी मानले.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी