शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

विक्रमी मताधिक्याने विजयाचे दावे फोल

By admin | Updated: January 28, 2016 02:34 IST

यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक कधी नव्हे ऐवढी चुरशीची झाली.

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक कधी नव्हे ऐवढी चुरशीची झाली. थेट लढत असलेल्या सहकार आणि महासमन्वय पॅनलने केलेले मताधिक्याने विजयाचे दावे फोल ठरले आहे. दोन्ही पॅनलने ५०० ते १००० मताधिक्याने विजयाचा दावा केला होता. एकही विजयी उमेदवार तीन हजार ५०० मतापर्यंत पोहोचला नाही. सर्वाधिक ३ हजार ४६७ मते सहकार पॅनलचे प्रमुख राजूदास जाधव यांनी घेतली. याच पॅनलचे मारोती आत्राम हे केवळ २८ मतांनी विजयी झाले. ७ हजार ७०० मतदार असलेल्या या संस्थेत किमान ५०० पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयाची अपेक्षा केली जात होती. परंतु कुणीही ३०० पेक्षा अधिक मताधिक्य घेतले नाही. या निवडणुकीत दोन्ही पॅनलचे ३४ आणि इतर नऊ असे ४३ उमेदवार रिंगणात होते. महिला राखीव गटातून दोन्ही पॅनलला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. सहकार पॅनलच्या नंदा नागनाथ चाटे या ३ हजार ३२७ मते घेऊन तर महासमन्वय पॅनलच्या सुचिता शांताराम बोंद्रे ३ हजार ३२५ मते घेऊन विजयी झाल्या. याच मतदारसंघातील सहकार पॅनलच्या सुनंदा आनंदराव वडपल्लीवार ३०८४ तर महासमन्वयच्या मानंदा गणपतराव राठोड यांनी ३२१३ मते घेतली. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महासमान्वय पॅनलचे मधुकर दिगांबर काठोडे यांनी ३५२६ मते घेत विजय नोंदविला. समन्वय पॅनलचे भानुदास राऊत यांनी ३३१३ मते घेतली. सर्वात अटीतटीची लढत अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघात झाली. सहकार पॅनलचे मारोती आत्राम ३३१८ मते घेत विजयी झाले, त्यांनी महासमन्वय पॅनलचे राजू सूर्यवंशी ३२९० यांचा केवळ २८ मतांनी पराभव केला. विजाभज/विमाप्र मतदारसंघातून सहकार पॅनलचे नंदेशकुमार चव्हाण यांनी ३ हजार ५६१ मते घेत विजय मिळविला. महासमन्वय पॅनलचे साहेबराव पवार यांना ३३३८ मते मिळाली. २२३ मतांनी चव्हाण यांचा विजय झाला. सर्वसाधारण मतदारसंघातील विजयी उमेदवारांनी घेतलेली मते असे आहेत. सहकार पॅनलचे राजूदास जाधव (३४६७), चित्तरंजन कडू (३३३५), राजेंद्र पिंपळशेंडे (३३१५), डॉ. दिलीप चौधरी (३३०९), प्रवीण राणे (३२७४), दीपक दोडके (३२७१), गौतम कांबळे (३२५९), एकनाथ गाडगे (३२५४), अनिल जयसिंगपुरे (३२४७), शेख लुकमान शेख रहेमान (३२२३), महासमन्वय पॅनलचे संजय गावंडे (३२६२), मुकेश भोयर (३२४१) विजयी झाले. सकाळी १० वाजता येथी मतमोजणीला सुरूवात झाली. सायंकाळी ४ वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले. मात्र काही जागांवर फेरमतमोजणी मागण्यात आल्याने रात्री ११ वाजता उमेदवारांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)