शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांनी युवकाला लुटले, राळेगाव तालुक्यातील करंजी सोनामाता गावची घटना

By विलास गावंडे | Updated: April 24, 2023 17:39 IST

दोघांना केली अटक

वडकी (यवतमाळ) : पोलिस असल्याची बतावणी करून युवकाला लुटणाऱ्या दोघांना वडकी पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली. करंजी सोनामाता (ता.राळेगाव) येथे २२ एप्रिलच्या रात्री १०:३०च्या सुमारास घडलेल्या घटनेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील एक जण करंजी सोनामाता येथील, तर दुसरा हिंगणघाट (जि. वर्धा) येथील रहिवासी आहे.

करंजी सोनामाता येथील विकास विठ्ठल कोडापे (२५) हे घरासमोर बंडीवर झोपून होते. त्यावेळी दोन जण त्यांच्याजवळ आले. आपण पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळ असलेले तीन हजार ५०० रुपये घेऊन पसार झाले. या प्रकाराची तक्रार विकास कोडापे यांनी २३ एप्रिल रोजी वडकी पोलिसात दिली. ठाणेदार विजय महाले यांनी लगेच या प्रकाराचा तपास सुरू केला. चोरट्याचे वर्णन, वापरलेले साहित्य व वाहन आदी माहिती तक्रारदाराकडून घेतली.या आधारे तपासाचे चक्र वेगाने फिरविण्यात आली.

ठाणेदार हे पथकासह लुटारुंच्या शोधात वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. आरोपींना पकडण्यात त्यांना यश आले. महेंद्र रमेश अंबुलकर (४५) रा.शास्त्री वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा याला हिंगणघाट येथून, तर दीपक पंढरी मेश्राम (४०) रा. करंजी सोनामाता याला वडनेर येथून अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून एक चारचाकी, दोन दुचाकी, दोन प्लास्टिक काठ्या व लुटलेली रक्कम जप्त करण्यात आली. लुटारुंमध्ये आणखी एकाचा सहभाग असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय महाले, पोलिस उपनिरीक्षक विजय चलाख, विनोद नागरगोजे, विलास जाधव, विक्की धावर्तीवार, सचिन नेहारे यांनी ही कारवाई पार पाडली.

दुसऱ्या गुन्ह्यातही सहभाग

करंजी सोनामाता येथील घटनेचा तपास करतानाच पोलिसांना यवतमाळ येथील व्यक्तीला लुटल्याच्या घटनेचाही तपास लागला. अटकेतील आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस असल्याची बतावणी करून यवतमाळ येथील सुमेद लक्ष्मण लोखंडे यांनाही लुटल्याची नोंद पोलिस दप्तरी होती. या घटनेत आणखी दोघांचा समावेश असल्याची माहिती आरोपींनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ