शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी बनावट कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:08 IST

एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकाचा प्रताप : चौकशी समितीच्या अहवालाकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.आर्णी तालुक्यात सध्या कार्यरत नागरगोजे नामक ग्रामसेवक पूर्वी रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला. त्यात आपली पत्नी यवतमाळ जिल्ह्यातील एका संस्थेवर स्वयंपाकी म्हणून कार्यरत असल्याचे कागदपत्र जोडले. पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमानुसार ते पात्र ठरल्याने शासनाने त्यांच्या आंतरजिल्हा बदलीला मंजुरी दिली. त्यानंतर ते यवतमाळ जिल्हा परिषदेत रुजू झाले. वास्तविक कर्मचाऱ्याला रुजू करून घेताना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी त्या विभाग प्रमुखाची असते. मात्र येथील जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे ग्राह्य धरून त्यांना रुजू करून घेतले.आता या प्रकरणाचा भंडफोड झाला. त्या ग्रामसेवकाने पत्नी एका संस्थेत स्वयंपाकी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र त्या संस्थेत दुसरीच व्यक्ती स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सदर ग्रामसेवकाने पत्नी संस्थेत नोकरीत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून बदली करवून घेतल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यात संस्थेचीही परस्पर फसवणूक झाली. त्यामुळे ती संस्थाही ग्रामसेवकाविरूद्ध फौजदारी तक्रार करणार असल्याचे कळते.तीन दिवसात अहवालजिल्हा परिषदेच्या तीन सदस्यीय चौकशी समितीचे प्रमुख विस्तार अधिकारी रामदास चंदनकर आहे. या समितीत नेरच्या विस्तार अधिकारी रिंकी डाबरे आणि यवतमाळचे विस्तार अधिकारी आर.आर. जारंडे यांचा समावेश आहे. ही समिती येत्या दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार असल्याचे चंदनकर यांनी सांगितले. सदर ग्रामसेवक संघटनेचा तालुका पदाधिकारीसुद्धा आहे. तथापि त्याला रुजू करून घेतानाच या सर्व कागदपत्रांची पडताळणी का करण्यात आली नाही, याची चौकशी होणेही गरजेचे झाले आहे.