शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तस्करांचा ‘पैनगंगा’वर डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:51 IST

केंद्र सरकारातील गृहराज्य मंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीला आता कोळसा तस्करांनी टार्गेट केले आहे.

ठळक मुद्देतपास थंडबस्त्यात : चोरीच्या कोळशाची कोलडेपोवर विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : केंद्र सरकारातील गृहराज्य मंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीला आता कोळसा तस्करांनी टार्गेट केले आहे. गंभीर बाब ही की, वणी शहरालगतच्या लालपुलिया परिसरातील काही कोलडेपोंवर या चोरीतील कोळशाची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती असून या कोलडेपो चालकांचे तस्करांशी साटेलोटे असल्याचे सांगितले जाते. या व्यवहारातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.मागील १५ दिवसांपूर्वी पैनगंगा परियोजना या कोळसा खाणीतून कोळसा चोरल्यानंतर त्याची विल्हेवाट वणीतील एका कोलडेपोवर लावण्यात आली होती. गडचांदूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. एम.एच.४०-बी.जी ६६३६ या क्रमांकाच्या ट्रकमधून पैनगंगा कोळसा खाणीतून ३० टन कोळसा चोरून आणून तो वणीतील एका कोळसा डेपोवर उतरविण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गडचांदूर पोलिसांचे एक पथक मध्यंतरी वणीत येऊन गेले. मात्र या विषयात अद्याप कुणालाही अटक झाली नाही. यासंदर्भात गडचांदूरचे ठाणेदार महेश कोंडावार यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या रमजानचा सण असल्याने आम्ही बंदोबस्तात व्यस्त आहोत. बंदोबस्त संपला की लगेच हे प्रकरण हाती घेऊ असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वणी परिसरातील १२ खाणींपैैकी मुंगोली, निलजई, उकणी, जुनाड या खाणी सुरू आहेत. अन्य खाणी मात्र बंद अवस्थेत आहेत. मात्र तरीही कोळशाची तस्करी सुरू आहे. मात्र तस्करांची संख्या मोठी असल्याने राजकीय आश्रय असलेल्या तस्करांचे या खाणींमध्ये फावत आहे. ज्यांना राजकीय आश्रय नाही, ते तस्कर पैैनगंगा परियोजनेतून कोळसा लंपास करीत असल्याची माहिती आहे.हा चोरीचा कोळसा वणीतील काही विशिष्ट कोलडेपोवर ‘लोड’ केला जात असल्याची माहिती एका जाणकाराने दिली. यासाठी एका मध्यस्ताची नेमणूक केली असून तस्कर आणि कोलडेपो चालक यांच्याातील सेतूचे काम हा मध्यस्त करीत असल्याचे सांगण्यात येते. त्याला कमिशनपोटी मोठी रक्कमही दिली जात आहे. मध्यरात्रीनंतर हा हेराफेरीचा कारभार सुरू केला जातो.भंगार चोरी सुरूच; वेकोलिकडून मात्र तक्रारीच नाहीकोळसा खाणीतील भंगार चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. लाखो रुपयांचे भंगार बंद असलेल्या खाणीतून पळविले जात आहे. या पार्श्वभूमीवर वणी परिसरात भंगाराच्या दुकानातही वाढ झाली आहे. अनेकदा चोरी होऊनही वेकोलिकडून तक्रार करण्यास टाळाटाळ केली जाते.