संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील उकणी (डीप) या कोळसाखाणीचे विस्तारीकरण उधारीवर सुरू आहे. विस्तारीकरणासाठी वेकोलिने जमिनी संपादीत केल्या. मागील वर्षी त्याचा मोबदलाही दिला. परंतु काही लाभार्थ्यांना अद्यापही नोकऱ्या देण्यात आल्या नाही आणि ज्यांना नोकऱ्यां नको आहे, त्यांना नियमानुसार कम्पलसेशनही देण्यात आले नाही. यासाठी संबंधिताना वेकोलि कार्यालयात येरझारा कराव्या लागत आहे.उकणी (डीप) खाणीसाठी वेकोलि प्रशासनाने सन २०११ मध्ये उकणी व पिंपळगाव खंड दोनमधील १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ३०४ हेक्टर शेती संपादीत केली. या संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल आठ वर्षानंतर म्हणजेच सन २०१९ मध्ये दिला.यातील काही शेतकºयांच्या पाल्यांना वेकोलिने नोकऱ्याही दिल्या. परंतु २० लाभार्थ्यांना अद्यापही नोकरी अथवा कम्पलसेशन देण्यात आले नाही. मागील अनेक महिन्यांपासून लाभार्थी वेकोलिच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु वेकोलिकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.तर कोळसा खाण बंद पाडू -विश्वास नांदेकरवेकोलिने जमिनी घेऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले आहे. अनेक लाभार्थ्यांना नोकºया किंवा नोकरीचे कम्पलसेशन अद्याप देण्यात आले नाही. येत्या आठ दिवसांत वेकोलिने संबंधित शेतकºयांना नोकरी अथवा कम्पलसेशन दिले नाही, तर उकणी कोळसा खाण बंद पाडू, असा गर्भीत इशारा शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी दिला आहे. या कोळसा खाणीत ओव्हरबर्डन वाहतूक करण्यासाठी जी वाहने वापरण्यात येत आहे, ती सर्व वाहने कालबाह्यझाली असून या वाहनांना आरटीओने परवानगी दिलीच कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्या रस्त्यावर वेकोलिची वाहने धावत आहेत, ते रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे आहेत. या रस्त्यावरून विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचा आरोपही विश्वास नांदेकर यांनी केला.
उकणी खाणीचे विस्तारीकरण उधारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST
तालुक्यातील उकणी (डीप) या कोळसाखाणीचे विस्तारीकरण उधारीवर सुरू आहे. विस्तारीकरणासाठी वेकोलिने जमिनी संपादीत केल्या. मागील वर्षी त्याचा मोबदलाही दिला. परंतु काही लाभार्थ्यांना अद्यापही नोकऱ्या देण्यात आल्या नाही आणि ज्यांना नोकऱ्यां नको आहे, त्यांना नियमानुसार कम्पलसेशनही देण्यात आले नाही. यासाठी संबंधिताना वेकोलि कार्यालयात येरझारा कराव्या लागत आहे.
उकणी खाणीचे विस्तारीकरण उधारीवर
ठळक मुद्देमोबदला मिळाला : नोकऱ्या, कम्पलसेशनसाठी शेतकऱ्यां येरझारा