लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात गौण खनिजाचे खुलेआम अवैध उत्खनन सुरू आहे. गौण खनिज वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.विविध विकास कामांसाठी गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. मात्र रॉयल्टी न काढताच अनेक ठिकाणी हे उत्खनन सुरू आहे. तुळजापूर-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीही गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. हे गौण खनिज मोठ्या वाहनांनी वाहून नेले जाते. वाहनांच्या मागून धूळ उडत असल्याने इतर वाहनचालक व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांमधून गौण खनिज रस्त्यावर सांडत आहे. यामुळे अनेकदा अपघातही घडत आहे.तालुक्यात सर्वत्र गौण खनिजाचे अवैध उत्खनन होत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. सर्व नियम पायदळी तुडवून अवैध उत्खनन केले जात आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासन धजावत नाही. यामुळे दिवसेंदिवस पर्यावरण समतोल बिघडत आहे. गौण खनिज व रेती उपस्यावर शासनाने बंदी घातली असतानाही राजरोसपणे तस्करी केली जात आहे. यातून शासनालाही चुना लागत आहे.अपघाताच्या संख्येत वाढगौण खनिज वाहून नेणाऱ्या वाहनांमधून धूळ उडत असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. धनोडा ते कोसदनी दरम्यान महिनाभरापूर्वीच अपघात होवून दुचाकी चालकाचा जीव गेला होता. त्यामुळे अवैध उत्खननाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा अपघातात अनेकांना नाहक जीव गमवावा लागू शकतो. तरीही महसूल प्रशासन मूग गिळून बसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
उमरखेड तालुक्यात गौण खनिजाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:06 IST
तालुक्यात गौण खनिजाचे खुलेआम अवैध उत्खनन सुरू आहे. गौण खनिज वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विविध विकास कामांसाठी गौण खनिजाचे उत्खनन केले जाते.
उमरखेड तालुक्यात गौण खनिजाचे उत्खनन
ठळक मुद्देनागरिक त्रस्त : धुळीमुळे आरोग्याला धोका, महसूल प्रशासन मूग गिळून