शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्यात टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:34 IST

शेतजमीन आणि शेती पिकाचे मोठे नुकसान होत असतानाही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाला मूठमाती देत विविध लाभ देण्यात मनमानी केली जात आहे. यातून मुक्तता व्हावी यासाठी तालुक्यातील टॉवरग्रस्त १ मे रोजी आंदोलन करणार आहेत.

ठळक मुद्देकंपनीची मनमानी : १ मे रोजी आंदोलन, शासनाच्या नव्या निर्णयाला मूठमाती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतजमीन आणि शेती पिकाचे मोठे नुकसान होत असतानाही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाला मूठमाती देत विविध लाभ देण्यात मनमानी केली जात आहे. यातून मुक्तता व्हावी यासाठी तालुक्यातील टॉवरग्रस्त १ मे रोजी आंदोलन करणार आहेत.तालुक्याच्या जवळपास ३०० शेतकऱ्यांच्या जमिनीवर टॉवर उभारण्यात आले आहे. यासाठीचा मोबदला २००७ च्या आदेशानुसारच दिला जाईल, यावर कंपनी ठाम आहे. या प्रकारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने सन २०१० मध्ये नवीन आदेश काढला. यात स्पष्ट करण्यात आलेल्या बाबीनुसार मोबदला दिला जात नाही. टॉवरखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र मोजून दीडपट मोबदला द्यावा, रेडीरेकनरच्या दरापेक्षा दुप्पट मोबदला टॉवरग्रस्तांना देण्यात यावा, टॉवरकतिा दोन गुंठे जमीन गेली असल्यास ती तीन गुंठे धरावी, कोरडवाहू जमिनीचा दर प्रती एकर तीन लाख रुपये असल्यास चार लाख रुपये एकर धरण्यात यावा, ताराखाली असलेली जमीन कॉरिडोरसह अर्थात लांबी-रूंदी जे क्षेत्र येईल त्याच्या १५ टक्के नुकसानीचे क्षेत्र ग्राह्य धरावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र कपंनी जुन्याच आदेशाने मदतीवर अडून बसली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. यानंतरही कंपनी मानत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी टॉवरविरोधी कृती समिती स्थापन केली आहे. समितीने केलेल्या आंदोलनामुळे ऊर्जा व कामगार विभागाने ३१ मे २०१७ रोजी मोबदल्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला. त्यातही योग्य मोबदला मिळण्याची खात्री नाही, असे टॉवरग्रस्त आंदोलन समितीचे मिलन राठोड यांनी म्हटले आहे. हा प्रश्न निकाली न निघावा यासाठीच १ मे रोजी आंदोलन केले जाणार आहे.शेतात काम करताना भीतीशेतात उभारलेल्या टॉवरमुळे नुकसान होत आहे. माकडं पिकांची नासाडी करून टॉवरवर चढून बसतात. अनेक ठिकाणी अर्थिंग योग्य नसल्याने शेतात काम करणाऱ्यांच्या पायांना मुंग्या येतात, सौम्य विद्युत धक्का बसतो. टॉवरच्या आजूबाजूला विहीर, बोअरवेल करता येत नाही. लगतच्या भागात पिकाला पाणीही देता येत नाही. एवढे नुकसान सहन करूनही कंपनी नियमानुसार मदतीस टाळाटाळ करत आहे.

टॅग्स :electricityवीज