शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी आमदारांचीही लागणार कसोटी

By admin | Updated: February 8, 2017 00:28 IST

येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक : चार गटातून १७ तर आठ गणातून ३८ उमेदवार रिंगणात नरेश मानकर  पांढरकवडा येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेच्या ४ गटातून १७ उमेदवार तर पंचायत समितीच्या आठ गणातून ३८ उमेदवार निवडणूकरिंगणात आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर तसेच तालुक्यातील पंचायत समितीवर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम व काँग्रेसचे शिवाजीराव मोघे व प्रा.वसंतराव पुरके या काँग्रेसच्या दोन माजी आमदारांची कसोटी लागणार आहे. आजपर्यंत तालुक्यातून जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. हिच परिस्थिती पंचायत समितीच्या निवडणुकीची असून आजपर्यंत पंचायत समितीवर सुध्दा भाजपचे फुल उगवले नाही. अद्याप पर्यंत भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले खाते न उघडल्यामुळे या निवडणुकीत तरी आपले उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी भाजप आमदाराचा चांगलाच कस लागणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे व या भागातील आमदारसुध्दा भाजपचा असल्यामुळे ही निवडणूक भाजप आमदारासाठी महत्वाची आहे. मागील निवडणुकीत असलेल्या मोहदा, पहापळ , पाटणबोरी या तीन जिल्हा परिषद गटात आता खैरगाव (बु.) या एका नविन गटाची भर पडली आहे. या चारही गटातून एकुण २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून चार गटातून १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. पाटणबोरी या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण असलेल्या गटातून सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता या गटातू ४ उमेदवार निवडणूक लढवित आहे. सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या पहापळ गटातून पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली असून या गटातून आता ४ उमेदवार निंवडणूक लढवित आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मोहदा या गटातून आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून या गटामधून आता सहा उमेदवार निवडणूक लढवित आहे. पाटणबोरीतून सहा पैैकी एकाची माघार नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या खैरगाव बु.या गटातून पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.पंचायत समितीच्या पाटणबोरी या सर्वसाधारण गणातून सहापैकी एका उमेदवारांने माघार घेतली असून या गणातून ५ उमेदवार निवडणूकलढवित आहे.