अखेर दारव्हा रोडवरील खड्डे बुजविण्याला मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 06:00 AM2019-10-08T06:00:00+5:302019-10-08T06:00:07+5:30

बसस्थानक ते लोहारा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग म्हणजे शहराचा चेहरा होता. मात्र या चेहऱ्यावरच खड्डे पडल्याने संपूर्ण शहरच विद्रूप असल्याची खात्री पटत होती. परंतु आता या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविले जात आहे. विधानसभा निवडणूक काळात या माध्यमातून मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही सूर आहे.

Eventually, a ditch on the Darva Road was found | अखेर दारव्हा रोडवरील खड्डे बुजविण्याला मुहूर्त सापडला

अखेर दारव्हा रोडवरील खड्डे बुजविण्याला मुहूर्त सापडला

Next
ठळक मुद्देरस्ता यवतमाळ नगरपरिषदेचा : पुढाकार सार्वजनिक बांधकाम खात्याचा !

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहरात सर्वत्र खड्डे आहेत. एवढेच नव्हे तर शहराच्या मधातून जाणाऱ्या पांढरकवडा-लोहारा या मुख्य मार्गालाही ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या खड्ड्यांविरोधात यवतमाळकर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अखेर या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचा मुहूर्त सार्वजनिक बांधकाम विभागाला सापडला. सोमवारी सकाळपासून दारव्हा रोडवरील हे खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला.
बसस्थानक ते लोहारा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग म्हणजे शहराचा चेहरा होता. मात्र या चेहऱ्यावरच खड्डे पडल्याने संपूर्ण शहरच विद्रूप असल्याची खात्री पटत होती. परंतु आता या प्रमुख मार्गावरील खड्डे बुजविले जात आहे. विधानसभा निवडणूक काळात या माध्यमातून मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही सूर आहे. खड्डे बुजविण्याची ही मोहीम संपूर्ण शहरात व अंतर्गत रस्त्यांवरही राबविली जाते का हे पाहणे महत्वाचे ठरते. वास्तविक हायब्रीड अ‍ॅन्युईटी या योजनेतून यवतमाळ-दारव्हा-मंगरुळपीर या रस्त्याचे बांधकाम, रुंदीकरण मंजूर करण्यात आले आहे. मुंबईच्या (कल्याण) ईगल कंस्ट्रक्शन कंपनीला हा कंत्राट मिळाला आहे. याशिवाय कोळंबी-वडगाव जंगल-पांढरकवडा हा कंत्राटही ईगलकडेच आहे. यवतमाळ ते मंगरुळपीर हा मार्ग लोहारापासून विकसित होणार असला तरी शहरातील लोहारा ते बसस्थानक या मार्गाचा त्यात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला आचारसंहितेनंतर मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Eventually, a ditch on the Darva Road was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.