शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही वणीत गांजाचे झुरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

एकीकडे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतून आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे व्यसनांध तरूणाई पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून गांजा ओढण्यासाठी निर्जनस्थळावर गर्दी करित आहे. या व्यसनांधांना गांजा नेमका कोठून पुरविला जातो, याचा शोध घेणेही तितकेच पोलिसांसाठी महत्वाचे ठरले आहे.

ठळक मुद्देदारूवर पर्याय : सुगंधीत तंबाखू, सुपारीचाही काळाबाजार, चौपट दराने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एरव्ही निर्जनस्थळावर गांजा ओढणाऱ्यांची नेहमीच गर्दी पहायला मिळते. लॉकडाऊननंतर ही गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढल्याचे भयावह चित्र वणी शहरात पहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून शासन आदेशानुसार दारूदुकाने बंद आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेले लोक पर्याय म्हणून गांजा ओढत असल्याची चिंताजनक बाब पुढे आली आहे. या व्यसनांध तरूणाईचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे गांजा शौकीनांमध्ये १० ते २५ वर्ष वयोगटातील मुलांची संख्या अधिक आहे.एकीकडे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतून आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे व्यसनांध तरूणाई पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून गांजा ओढण्यासाठी निर्जनस्थळावर गर्दी करित आहे. या व्यसनांधांना गांजा नेमका कोठून पुरविला जातो, याचा शोध घेणेही तितकेच पोलिसांसाठी महत्वाचे ठरले आहे. दुपारी ३ वाजतानंतर वणी शहर पूर्णत: लॉकडाऊन होते. रस्त्यावर शुकशुकाट असतो. सायंकाळच्यावेळी गांजा शौकीन मात्र निर्जनस्थळी एकत्र येऊन गांजाचे झुरके ओढतात. निर्गुडा नदीच्या काठावरील झुडूपात लपून तरूणाई आपले व्यसन पूर्ण करताना दिसत आहे.सकाळच्यावेळीही याठिकाणी १० ते २० जणांचे टोळके एकत्रित बसून गांजा ओढताना अनेकांनी पाहिले आहे. दुसरीकडे वणी शहरात खºर्याचे शौकीनही मोठ्या संख्येने आहे. परंतु लॉकडाऊननंतर खर्रा शौकीनांची चांगलेच हाल सुरू झाले. सुगंधीत तंबाखूच्या पुरवठाधारकांनी माल मिळत नसल्याचा कांगावा करत तंबाखू चारपट दराने विकणे सुरू केले आहे. सुपारीचे भावदेखील तिप्पट झाले आहे. अशाही परिस्थितीत खºर्याच्या आहारी गेलेले शौकीन ४० रूपये देऊन खर्रा खरेदी करित आहे. संचारबंदीच्या काळात पानटपऱ्यांवरही बंदी घालण्यात आली. मात्र शहरातील काही पानटपरीधारक घरीच खर्रा तयार करून संबंधित शौकीनांना त्यांच्या घरापर्यंत खर्रा पोहोचवून देत आहेत. अशांचा शोध घेणेही पोलिसांपुढे जिकरीचे ठरत आहे.गांधी चौकातून होतोयं तंबाखूचा पुरवठासुगंधीत तंबाखू व सुपारीच्या पुरवठ्याचे केंद्र गांधी चौक ठरले आहे. लॉकडाऊनमुळे हे केंद्र बंद असले तरी तंबाखू वितरकांचे एजंट छुप्या मार्गाने तंबाखू व सुपारी संबंधित खर्रा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवित आहेत.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी