शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

कोरोनातही कास्तकारांची हिंमत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:07 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या खरीप हंगामातील पीक लागवडीचा अहवाल जाहीर केला आहे. त्या आकडेवारीनुसार यंदा संपूर्ण देशातील लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे कापूस दुपटीने तर सोयाबीन लागवड पाच पट अधिकदेशात पेरा वाढविला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आणि लॉकडाऊनने देशातील उद्योगधंदे अडचणीत असताना आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कृषी क्षेत्रावरही झालेला असताना देशातील कास्तकारांनी तगडी हिंमत कायम ठेवली आहे. या हिमतीमुळेच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड दुप्पट तर सोयाबीन लागवड पाच पटीने अधिक झाली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या खरीप हंगामातील पीक लागवडीचा अहवाल जाहीर केला आहे. त्या आकडेवारीनुसार यंदा संपूर्ण देशातील लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. देशात खरिपाचे अपेक्षित लागवड क्षेत्र १०६३ लाख हेक्टरपैकी मागील वर्षी केवळ २३० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र अडचणीत भर पडलेली असतानाही शेतकऱ्यांनी ४३२ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी केली आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा दुपटीने वाढविला. गेल्या वर्षी ४५ लाख ८५ हजार हेक्टरपर्यंत मर्यादित असलेला हा पेरा यंदा ९१ लाख ६७ हजार हेक्टरपर्यंत वाढला आहे. तर सोयाबीनचा पेरा मागील वर्षी १६ लाख ४३ हजार हेक्टरपर्यंत मर्यादित असताना यंदा हे क्षेत्र एकदम ८१ लाख ८१ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. तुरीची लागवडही यंदा २ लाख ७९ हजार हेक्टरवरून थेट आठ पटींनी वाढून १६ लाख ५६ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. याचाच प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातही आला असून यंदा ४ लाख ५५ हजार ५९९ हेक्टरमध्ये कापूस, २ लाख ७५ हजार ६२९ हेक्टरमध्ये सोयाबीन आणि १ लाख १० हजार ९५९ हेक्टरमध्ये तूर असे लागवड क्षेत्र वाढले आहे.कडधान्यात महाराष्ट्र अव्वलदेशात कापसाचा पेरा महाराष्ट्रात सर्वाधिक झाला आहे. त्यासह कडधान्याचा महाराष्ट्रात झालेला ११ लाख ९४ हजार हेक्टरवरील पेरा देशात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेश ६ लाख ५५ हजार, तेलंगणा २ लाख १६ हजार, राजस्थान १ लाख ९७ हजार, कर्नाटक १ लाख ८९ हजार, झारखंड ८९ हजार, उत्तर प्रदेश ६८ हजार, गुजरात ५३ हजार, आंध्र प्रदेश २७ हजार, छत्तीसगड २१ हजार, बिहार १९ हजार आणि हरियाणात केवळ १२ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेरा आहे. शिवाय, ज्वारी लागवडीतही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असून महाराष्ट्रातील उस लागवडही (१ लाख १० हजार हेक्टर) देशात सर्वाधिक ठरली.

टॅग्स :Farmerशेतकरी