ऑनलाईन लोकमतयवतमाळ : बसस्थानक चौकात सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघाताला टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला. मात्र दारव्हा मार्गावरील ट्रॅव्हल्स चालकांची दादागिरी आणि कमिशनखोरीतून पोलिसांची चुप्पी या प्रयोगाला हरताळ फासत आहे.वाहतुकीला वळण लावण्यासाठी बसस्थानक चौकात आर्णी मार्गाने येणारी वाहने दारव्हा मार्गाकडे वळवून यू-टर्नने बसस्थानक चौकात आणण्यात येत आहेत. मात्र दारव्हा मार्गावर दोन्ही बाजूंनी प्रवासी वाहने व ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण राहते. हे अतिक्रमण काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रस्त्याच्या दुतर्फा सिग्नल सुरू असतानाही ट्रॅव्हल्समधून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे यू-टर्न घेताना अनेक वाहनांना त्रास होतो. परिणामी येथे वाहतुकीची कोंडी कायम आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन या मार्गावरून जात होते. त्याच वेळी एका वाहतूक शिपायाच्या ट्रॅव्हल्समधून भर रस्त्याच्या मध्ये प्रवाशांची चढ-उतार सुरू होती. वाहतूक शाखेतील हा शिपाई ट्रॅव्हल्सच्या धंद्यात मोठा गुंतवणूकदार आहे. ट्रॅव्हल्स व प्रवासी वाहनाच्या पॉर्इंटवरून पोलिसांना मोठी रसद जाते. त्यामुळे त्यांच्याकडून होणाºया नियमांची पायमल्ली उघड्या डोळ्याने खपवून घेतली जाते.
‘यू-टर्न’नंतरही वाहतूक परिस्थिती ‘जैसे थे’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:28 IST
बसस्थानक चौकात सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत. या अपघाताला टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला.
‘यू-टर्न’नंतरही वाहतूक परिस्थिती ‘जैसे थे’च
ठळक मुद्देबसस्थानक चौक : ट्रॅव्हल्सचा सिग्नलवर ठिय्या