शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

कोट्यवधींच्या खर्चानंतरही जिल्हा अद्याप तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

पाणीटंचाई संपावी आणि भूजलस्रोतात वाढ व्हावी म्हणून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यावर ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. तरीही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपली नाही. जल प्रकल्पातून १८ टक्क्यांच्या वर सिंचन झाले नाही. नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्षित धोरणामुळे हमखास पाऊस बरसणारा प्रांत जलसंपत्ती विपुल असतानाही दुष्काळाच्या झळा सोसत आहे.

ठळक मुद्देमुबलक पाऊस बरसणाऱ्या प्रांतात सतत दुष्काळ, ओलीत अपुरेच

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुबलक पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात पावसाचा प्रत्येक थेंब साचून राहावा म्हणून सिंचन प्रकल्प उभे झाले. पाणीटंचाई संपावी आणि भूजलस्रोतात वाढ व्हावी म्हणून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यावर ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. तरीही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपली नाही. जल प्रकल्पातून १८ टक्क्यांच्या वर सिंचन झाले नाही. नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्षित धोरणामुळे हमखास पाऊस बरसणारा प्रांत जलसंपत्ती विपुल असतानाही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. २२ मार्च रोजी जलदिन साजरा होत असताना जिल्ह्यातील ही भयावह स्थिती समोर आली. यवतमाळ जिल्हा नैसर्गिक वनसंपदेने नटलेला आहे. जिल्ह्यात सतत पाऊस बरसतो. सह्याद्री पर्वतरांगेच्या शेवटच्या टोकावर असलेला हा जिल्हा पावसाचे ढग  रोखण्यसाठी पोषक वातावरण तयार करतो. यातून जिल्ह्यात मुबलक पाऊस बरसतो. मात्र, बरसलेला पाऊस साठवला जात नाही. तो मुरविण्यासाठी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योेजना आणण्यात आली. गाव, वाडे, वस्ती, पोड शिवारात नाले, ओढे आणि नदीचे पात्र खोल करण्यात आले. यावर ५५० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली. यानंतरही जिल्ह्यात पाणीटंचाईचा  प्रश्न कायम आहे. दरवर्षी टँकर लागतात. विहीर अधिग्रहित करावी लागते. केवळ उन्हाळ्याचा खर्च किमान ५ ते १० कोटींच्या घरात जातो. जिल्ह्यातील ५५० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. ६० ते ७० हजार लोक दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करतात. पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. हे चित्र अजूनही बदलले नाही. याउलट दरवर्षी पाण्याचा भूजलस्रोत खाली जात आहे. भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. ही झीज भरून काढण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पाहिजे तसे होत नाही. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाते. ते जमिनीत मुरतच नाही. जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प ठरले पांढरा हत्ती जिल्ह्यात मोठे, मध्यम, छोटे, असे २५० च्या जवळपास प्रकल्प आणि पाझर तलाव आहेत. याठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होतो. मात्र, उन्हाळ्यात हे प्रकल्प तळ गाठतात. प्रकल्पातून कार्यक्षेत्रात पाणी पोहोचविण्यासाठी कॅनॉलची रचना आहे. मात्र, शेवटच्या टाेकापर्यंत पाणी जात नाही. यामुळे कोट्ट्यवधींचा खर्च झाल्यानंतरही हे जल प्रकल्प पांढरा हत्ती ठरले आहेत. प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने अद्याप ओलीत होत नाही. ही जिल्ह्याची शाेकांतिका म्हणावी लागेल. जलयुक्त शिवार योजना राबवूनही जमिनीत पाणी मुरलेच नाही. मात्र या योजनेवरील कोट्यवधींचा खर्च मुरविण्यात यंत्रणा यशस्वी झाली. 

 

टॅग्स :Waterपाणी