शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण विभागाच्या दिरंगाईने रेतीघाट माफियाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:36 IST

प्रारंभी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले रेतीघाट आता पर्यावरण विभागाच्या दिरंगाईचा सामना करीत आहे. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफियांनी घाटावर आपला ताबा मिळविला आहे. रात्री छुप्या पद्धतीने रेतीचा उपसा करीत आहे.

ठळक मुद्देपरवानगीचा पेच : पहिल्या टप्प्यातील २६ रेतीघाटही अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रारंभी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले रेतीघाट आता पर्यावरण विभागाच्या दिरंगाईचा सामना करीत आहे. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफियांनी घाटावर आपला ताबा मिळविला आहे. रात्री छुप्या पद्धतीने रेतीचा उपसा करीत आहे. यातून शासनाच्या तिजारोला लाखोंचा फटका बसला आहे. तर सर्वसामान्य नागरिकांची खुलेआम लूट होत आहे.जिल्ह्यातील ६४ रेतीघाटांना भूजल सर्वेक्षण विभागाने उपसा करण्याची परवानगी दिली आहे. यातील २६ रेतीघाटांचा पहिल्या टप्प्यात लिलाव होणार आहे. त्याकरिता पर्यावरण विभागाची परवानगी खनिकर्म विभागाने मागितली आहे. मात्र पर्यावरण विभागाने कुठलीही परवानगी रेतीघाटांना दिली नाही.यामुळे जिल्ह्यातील ६४ रेतीघाट बेवारस अवस्थेत आहे. त्यांच्यावर महसूल प्रशासनाचा वॉच आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळ अपुरे आहे. सायंकाळी पहारा देणारी यंत्रणाही नाही.यामुळे जिल्ह्यातील रेतीघाटावर रेती माफियांनी महसूल प्रशासनाचा डोळा चुकवून लूट सुरू केली आहे. याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. रेती घाटातील उपसा बंद असल्याचे कारण पुढे करीत रेती विक्रेत्यांनी बेभाव रेतीची विक्री सुरू केली आहे. त्याचे दर २० हजार रूपये ट्रक असे झाले आहे. अधिकृत रेती मिळत नसल्याच्या बहाण्याने सर्वसामान्य ग्राहकांकडून रेतीसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात आहे. यातून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी पर्यावरण विभागाने पावले उचलण्याची नितांत गरज आहे. तरच रेतीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.सहा कोटींच्या महसुलावर पाणी२६ रेतीघाटांत सहा कोटींची रेती असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या ठिकाणी दिरंगाई झाल्याने महसुलासाठी लागणारी आॅनलाईन बोली वर चढण्याऐवजी घटण्याचाच धोका अधिक आहे. याचा फटका शासकीय तिजोरीलाच बसण्याचा अधिक धोका आहे.

टॅग्स :sandवाळू