लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस कर्मचारी सातत्याने तणावात काम करतात. सलग आलेल्या सण-उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिवाचे रान करतात. सामान्यांप्रमाणे त्यांना उत्सवांचा आनंद लुटता येत नाही. यावर्षी जिल्ह्यातील गणपती उत्सव पोलिसांनी असाच शांततेत पार पाडला. यात कष्ट उपसणाºया पोलीस कर्मचाºयांना रिलॅक्स करण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी थेट चित्रपटगृहाचा दरवाजा मोकळा करून दिला. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांनी प्रथमच सामूहिकरित्या चित्रपटाचा आनंद घेतला.पोलीस दलातील ‘टीम स्पिरीट’ कायम ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस कर्मचाºयांना बंदोबस्ताच्या तणावातून मोकळा श्वास घेण्यासाठी थेट चित्रपट बघण्याची मुभा दिली. त्यासाठी येथील एलिमेंट मॉलमधील टॉकिजचे दोन शो पोलिसांसाठी बुक केले. खुद्द पोलीस अधीक्षकांनी स्वत:हून सर्व कर्मचाºयांना ‘बादशाहो’ हा चित्रपट बघण्याची आॅफर दिली. यात खाकी वर्दीतील माणसाने पहिल्यांदाच वरिष्ठांनी कृतज्ञता व्यक्त केल्याचा अनुभव घेतला.जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ अधिकाºयांनी आपल्या अधिनस्त कर्मचाºयांची यशस्वी बंदोबस्तानंतर इतक्या आस्थेने विचारपूस केली. एवढेच नव्हे, तर त्यांचे जाहीर आभार मानले. आता पुन्हा लवकरच दुर्गोत्सव येत आहे. त्यासाठी पोलिसांना पुन्हा बंदोबस्तासाठी रस्त्यावर यावे लागणार आहे. मात्र, वरिष्ठांकडून मिळणारी ही सौजन्याची वागणूक कर्मचाºयांसाठी उत्साहवर्धक व प्रेरणा देणारी निश्चितच ठरणार आहे.पिक्चर अभी बाकी हैं... : आपल्या माणसाचे दु:ख आपल्या माणसालाच कळते... गणेशोत्सवात आपण आपल्या घरात, मंडळात मश्गुल होतो. रस्त्यावर तैनात पोलीस मात्र सर्वांच्या सुरक्षेसाठी गर्दीचे ‘दर्शन’ करीत राहिले. बेगुमान गर्दीने या ‘रक्षका’ला साधा नमस्कारही केला नाही. पण ‘साहेबां’नी कर्मचाºयांचे काळीज ओळखले. गणेशोत्सव आटोपताच पोलीस अधीक्षकांनी आपला संपूर्ण ताफा सिनेमा पाहाण्यासाठी पाठविला. टेन्शन रिलीज झाले. पण समाजरक्षणाचा सिनेमा अजून शिल्लक आहे. लवकरच दुर्गोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना सज्ज व्हावे लागणार आहे.
बंदोबस्त संपला, एन्जॉय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:14 IST
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस कर्मचारी सातत्याने तणावात काम करतात. सलग आलेल्या सण-उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिवाचे रान करतात. सामान्यांप्रमाणे त्यांना उत्सवांचा आनंद लुटता येत नाही. यावर्षी जिल्ह्यातील गणपती उत्सव पोलिसांनी असाच शांततेत पार पाडला. यात कष्ट उपसणाºया पोलीस कर्मचाºयांना रिलॅक्स करण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी थेट ...
बंदोबस्त संपला, एन्जॉय करा
ठळक मुद्देमुव्हीचा आनंद : एसपींकडून अनोखे ‘थॅक्स गिव्हींग’