शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता चौपदरीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:49 IST

स्थानिक लोहारा- पिंपळगाव बायपासचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा मार्ग शहरातून जात असून येथून जडवाहनांची प्रचंड वर्दळ आहे. धामणगाव व अमरावती मार्गाला जोडणारा हा बायपास तब्बल २४ मीटर रूंद करून चौपदरी केला जाणार आहे.

ठळक मुद्देशेकडो बेघर : लोहारा-वाघापूर ते पिंपळगाव, सात किलोमीटर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक लोहारा- पिंपळगाव बायपासचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा मार्ग शहरातून जात असून येथून जडवाहनांची प्रचंड वर्दळ आहे. धामणगाव व अमरावती मार्गाला जोडणारा हा बायपास तब्बल २४ मीटर रूंद करून चौपदरी केला जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता.लोहारा-पिंपळगाव बायपासवर अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण होते. अनेकांनी तर येथे पक्क्या घराचे बांधकाम केले होते. बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. इतकेच नव्हेतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोजमाप करून लाल पट्ट्याचे मार्किंग केले. त्यानंतरही येथील अतिक्रमण स्वत:हून काढण्यात आले नाही. अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने संयुक्त मोहीम हाती घेतली. पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर येणाऱ्या घरांवर जेसीबी चढवण्यात आला. रस्त्यावर येणाºया झोपड्या - पक्की घरे, विविध नामफलक, चबुतरे काढण्यात आले. ही मोहीम सकाळी १० वाजता सुरू करण्यात आली. लोहारा चौकातून अतिक्रमण मोहीम येत असल्याचे कळताच अनेकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. वाघापूर नाका परिसरात झोपड्या काढताना तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी स्थिती हाताळत अतिक्रमण मोहीम कायम ठेवली. ही मोहीम आणखी दोन दिवस चालणार असल्याचे बांधकाम अभियंत्यांनी सांगितले.अनधिकृत तरीही अगतिकलोहारा, वाघापूर आणि पिंपळगाव परिसरातून जाणाऱ्या या बायपास मार्गालगत मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे. लोहारा आणि वाघापूर येथे शेकडो गोरगरिबांनी अतिक्रमण करून झोपडीवजा घरे बांधून निवारा शोधला होता. आता रस्ता चौपदरीकरणासाठी ही घरे पाडली गेली. तर काही घरे अंशत: तोडली गेली. घरासाठी अतिक्रमण करणारे हे नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने अगतिकही आहेत. मात्र अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना हुज्जतबाजी न करता अनेकांनी स्वत:हून आपल्या घरातील साहित्य बाजूला केले. भरथंडीत निवाºयाचा प्रश्न मात्र कायम आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण