शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

चिकणी पशुचिकित्सालयात कंत्राटदाराचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:53 IST

तालुक्याच्या चिकणी(डोमगा) येथील पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी कुणीही कारवाई केली नाही.

ठळक मुद्देकंपाऊंडही बांधले : आठ वर्षांपासून चौकशीही नाही, चिकित्सेत येतो अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्याच्या चिकणी(डोमगा) येथील पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी कुणीही कारवाई केली नाही. या कंत्राटदाराने पशुचिकित्सालयाला कंपाऊंडही करून टाकले आहे. आता काही जागरूक नागरिकांनी कंत्राटदाराचे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी लाऊन धरली आहे.चिकणी(डोमगा) येथे पशुचिकित्सालयाची इमारत उभी करण्यात आली. मात्र या इमारतीचे हस्तांतरण झाले नाही. आजही खुल्या जागेत पशुचिकित्सा केली जात आहे. हीच संधी कंत्राटदाराने साधली आहे. त्याने या इमारतीमध्ये आपला पसारा मांडला आहे. विशेष म्हणजे, या कंत्राटदाराचे चिकणी(डोमगा) गावात स्वत:च्या मालकीचे घर आहे. संबंधित विभाग या कंत्राटदारावर एवढा मेहरबान का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, सदर गाव एका प्रसिद्ध राजकीय व्यक्तीचे आहे. त्यांच्याच घरासमोर खुल्या जागेत पशुचिकित्सा केली जाते. त्यांच्याकङ्मूनही यासंदर्भात कुठलीही पाऊले उचलली गेली नसल्याची तक्रार या गावातील नितीन डोंगरे यांनी संबंधितांकडे केली आहे. सदर अतिक्रमण काढावे, अशी मागणी त्यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केल्याच्या प्रकाराला सरपंच दिलीप जाधव यांनीही दुजोरा दिला आहे.