शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या सरकारी इमारती बनल्या गैरप्रकाराचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:18 IST

लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काही सरकारी इमारतींचा वापर थांबला आहे. या इमारती आता गैरप्रकाराचा अड्डा बनल्या आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : नेर येथे मोकळे रान, शांतता व सुव्यवस्थेला धोका

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या काही सरकारी इमारतींचा वापर थांबला आहे. या इमारती आता गैरप्रकाराचा अड्डा बनल्या आहे. संध्याकाळनंतर त्याठिकाणी चालत असलेले प्रकार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवाय शांतता व सुव्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे. तालुका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांसाठी रान मोकळे झाले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतींचा वापर संबंधितांकडून केला जात नाही. पंचायत समितीजवळ जुने शासकीय रुग्णालय होते. दहा वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले. यानंतर काही वर्षेपर्यंत प्रसूती याशिवाय इतर रुग्णालयीन कामे या इमारतीमधून चालत होती. आता बेवारस पडून असलेली ही इमारत काही लोकांनी मौजमजेसाठी वापरणे सुरू केले आहे. काही प्रकरणात कारवाईसुद्धा पोलिसांकडून झाली आहे. इमारतीला दारे, खिडक्या असल्या तरी त्या लाऊन घेण्याची तसदी संबंधित प्रशासनाने कधीही घेतली नाही.अमरावती मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसाठी बांधलेले निवासस्थानही अडगळीत पडले आहे. भर वस्तीत ही वास्तू असतानाही अभियंता मुख्यालयी राहात नाही. या टुमदार इमारतीची दारे सताड उघडी आहेत. संध्याकाळच्यावेळी दारूड्यांकडून तसेच गांजा पिणाºयांकडून या इमारतीचा वापर केला जातो. अंधार पडल्यानंतर अनैतिक प्रकारही या ठिकाणाहून चालत असल्याची माहिती आहे. गर्दी वाढत असल्याने परिसातील लोकांसाठी हा प्रकार धोक्याचा ठरत आहे. कुणी हटकण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धाऊन येण्यापर्यंत मजल गेली आहे.या इमारतीचा वापर झाल्यास गैरकृत्य थांबून नागरिकांना सुरक्षितता मिळू शकते. किमान या इमारतीची देखभाल दुरुस्ती तरी नियमितपणे केली जावी, अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.