शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा रूग्णालयाचा कारभार मंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:29 IST

येथील उपजिल्हा रूग्णालयाला रिक्तपदाचे ग्रहण लागले असून त्यामुळे रूग्णांचे अक्षरश: हाल सुरू आहे. हे रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.

ठळक मुद्देउपजिल्हा रूग्णालय : सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन, रूग्णांचे हाल सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील उपजिल्हा रूग्णालयाला रिक्तपदाचे ग्रहण लागले असून त्यामुळे रूग्णांचे अक्षरश: हाल सुरू आहे. हे रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.जिल्हा पातळीवर वारंवार निवेदन देऊनही रिक्त पदे भरली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय झोटींग यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनातून झोटींग यांनी उपजिल्हा रूग्णालयातील समस्यांचा पाढाच वाचला. येथील उपजिल्हा रूग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाºयांमुळे रूग्णांना तातडीने आवश्यक वैद्यकीय सेवाव मिळण्यास विलंब होतो. परिणामी सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेल्या या रूग्णालयातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. १३ वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा येथे मंजुर असताना यातील एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे झोटींग यांनी निवेदनात नमूद केले आहे. अनेक वैद्यकीय अधीक्षक तर मुख्यालयी हजरच राहत नाही. जे वैद्यकीय अधिकारी प्रामाणीकपणे आपले कर्तव्य बजावतात, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. क्ष-किरण यंत्रापासून सर्वच अत्यावश्यक सामग्री याठिकाणी उपलब्ध आहे. परंतु हे यंत्र चालविणारे तंत्रज्ञच रूग्णालयात नाहीत. त्यामुळे ही यंत्रे तशीच धूळ खात पडून आहेत. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते संजय झोटींग यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाºयांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून निवेदने दिली. परंतु रिक्त पदे भरण्यासाठी आजवर कार्यवाही झाली नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल