शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निवारणार्थ कायम पाणीपुरवठा योजनांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 21:51 IST

शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी अमृत योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत रखडलेल्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : जिल्हा नियोजन समितीची बैठक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी अमृत योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत रखडलेल्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाणीस्त्रोत आहे, त्याचा उपयोग करून पाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना करण्यावर भर आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, आमदार मनोहरराव नाईक, डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, ख्वाजा बेग, हरिभाऊ राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलाज शर्मा, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य किरण मोघे आदी उपस्थित होते.दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व यंत्रणांच्या सहकार्याने दोन महिन्यात जवळपास दीड हजार शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत, हे कौतुकास्पद आहे. जिल्ह्यासाठी मंजूर चार हजार ८०० विहिरी व गत काळातील दीड हजार अपूर्ण विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. ग्रामपंचायतीच्या नळयोजना तसेच सर्व शासकीय इमारती सौर उर्जेवर घेण्यात येणार आहे. इतर विभागाला ३१ मार्च पूर्वी निधी खर्च करण्याचे बंधन असते. मात्र जिल्हा परिषदेला हा कालावधी २ वर्षाचा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने योग्य नियोजन करून निधी खर्च करावा. मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व इंग्रजकालीन पांदन रस्ते मोकळे करण्यात येतील, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या गत बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता, इतिवृत्तावरील अनुपालन अहवालास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ प्रारुप आराखड्यास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ अंतर्गत पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ अंतर्गत अर्थसंकल्पीय निधी, डिसेंबर अखेरपर्यंत झालेल्या खचार्चा आढावा घेण्यात आला. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली.बैठकीला नगराध्यक्ष कांचन चौधरी, सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.