कोरोना उपाययोजना साहित्य खरेदीत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:21+5:30

कोरोना उपाययोजनेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे भाव अवास्तव दाखविण्यात आले आहे. यामध्ये थ्रीलेअर मास्क हा प्रतिनग २० रुपयाप्रमाणे खरेदी केला. त्याचे बाजारमूल्य केवळ चार रुपये आहे. याचप्रमाणे दोन लेअर मास्क प्रतिनग १९ रुपयाने खरेदी केला. बाजारभाव ३.५० रुपये प्रतिनग आहे.

Embezzlement in the purchase of corona remedy materials | कोरोना उपाययोजना साहित्य खरेदीत अपहार

कोरोना उपाययोजना साहित्य खरेदीत अपहार

Next
ठळक मुद्देपुसद नगरपरिषद : ‘एमआयएम’ने घेतला आक्रमक पवित्रा, चौकशी समिती बसविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. याच आणीबाणीचा फायदा घेत पुसद नगरपरिषदेमध्ये साहित्य खरेदीचा मोठा घोटाळा झाला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, यासाठी एमआयएमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
कोरोना उपाययोजनेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे भाव अवास्तव दाखविण्यात आले आहे. यामध्ये थ्रीलेअर मास्क हा प्रतिनग २० रुपयाप्रमाणे खरेदी केला. त्याचे बाजारमूल्य केवळ चार रुपये आहे. याचप्रमाणे दोन लेअर मास्क प्रतिनग १९ रुपयाने खरेदी केला. बाजारभाव ३.५० रुपये प्रतिनग आहे. सर्जिकल मास्क , हॅन्डग्लोब्ज, अ‍ॅप्रॉन, कम्प्लीट पीपीई किट लायझोल आयपी ग्रॅन्ड, सॅनिटायझर, फेसशील्ड, इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स ऑक्सिमीटर बॅटरी असलेले हॅन्ड स्प्रे या साहित्याची खरेदी करताना बाजारभावापेक्षा तिप्पट, चौपट दर नगरपरिषदेने मोजले आहेत. याशिवाय मंडप टाकणे, बॅरेकेटस लावणे यावरही मोठी रक्कम खर्च केली आहे. मंडपासाठी आठ लाख ८३ हजार ३५० रुपये तर बॅरेकेटसवर चार लाख ४१ हजार ४८६ रुपये खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात इतका खर्च झाला नसल्याचे बाजार भावानुसार दिसून येते. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची गरज आहे. बॅरेकेटींग व मंडप व्यवस्था देणारा कंत्राटदार हा नगरपालिका कर्मचारी आहे व त्याचा मुलगा आहे. सर्व खरेदीची उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करून संवेदनशील काळात निधीच्या अपहार करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळे तालुकाध्यक्ष अमजद खान, मिर्झा आदिल बेग, सैय्यद सिद्दिकोद्दीन, फिरोज खान, डॉ.अन्सार, सोशल मीडिया शेख अतीक, अब्दुल रहेमान चव्हाण आदी उपस्थित होते.

दरामध्ये तफावत
पालिकेने दहा हजार ९६१ कापडी मास्कची खरेदी केली. या प्रत्येक मास्कचा दर १४ रुपये दाखविला आहे. बाजारात या मास्कचा ठोक भाव प्रति मास्क तीन रुपये आहे. १ लाख ५० हजार ३८५ रुपये कापडी मास्क खरेदीवर खर्च केले. बाजार भावापेक्षा चौपट दराने साहित्य खरेदी केली आहे.

Web Title: Embezzlement in the purchase of corona remedy materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.