शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळांवरील अत्याचाराविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

अहमदनगर जिल्ह्यात मेंढपाळ व महिलांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी घरात शिरून मेंढपाळांना मारहाण केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या मेहत्रे यांची शेताच्या वादातून जाळून हत्या करण्यात आली. चिंतामण ठेल्लरी यांना बेदम मारहाण केली. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी सात मेंढपाळांना मारहाण करून त्यांच्या ३५ मेंढ्या मारून टाकल्या.

ठळक मुद्देधनगर समाजामध्ये संताप : दिग्रस तहसीलदारांना निवेदन, हत्त्येचा गुन्हा दाखल करावा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मेंढपाळांवर होत असलेल्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तहसीलदारांना निवेदन दिले.अहमदनगर जिल्ह्यात मेंढपाळ व महिलांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी घरात शिरून मेंढपाळांना मारहाण केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या मेहत्रे यांची शेताच्या वादातून जाळून हत्या करण्यात आली. चिंतामण ठेल्लरी यांना बेदम मारहाण केली. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी सात मेंढपाळांना मारहाण करून त्यांच्या ३५ मेंढ्या मारून टाकल्या. औरंगाबाद जिल्ह्यात महिलेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. कोल्हार येथे संपूर्ण धनगर वस्ती जाळण्यात आली. जळगाव जिल्ह्यात १२० मेंढ्या पळवून नेल्या. विवाहितेवर अत्याचार केला. अमळनेर तालुक्यात मेंढपाळास हातपाय तोडून डोळे काढले. एका ट्रकचालकाने २५० मेंढ्या चिरडून टाकल्या. पुणे व सोलापूर जिल्ह्यात समाजबांधवांवर प्राणघातक हल्ला झाला. अशा अनेक घटना राज्यात घडल्या आहे. अन्याय आणि हल्ले सुरूच आहे. अशा गावगुंडांना प्रतिबंध घालण्यासाठी मोक्का, मिसा, पोटा आदी कायद्यांची तरतूद करावी अशी मागणी केली. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख यादव गावंडे, तानाजी घुमनर, डॉ.राजाभाऊ खांदवे, रवीशंकर पावडे, भास्कर गोरे, कुणाल परांडे, देवाशीष परांडे, दशरथ महानर उपस्थित होते.चराई पासेस द्याव्यातचराईसाठी वने आरक्षित करून चराई पासेस द्याव्या, मेंढपाळांवरील गंभीर गुन्ह्याची नोंद घेऊन त्यांना गावगुंड व जंगली श्वापदापासून रक्षणासाठी बंदुकीचा परवाना मिळावा, अशी मागणी केली. तसेच खोटे गुन्हे मागे घ्यावे, हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शेळी-मेंढी पालन व्यवसायासाठी कायमस्वरूपी २५ लाखांपर्यंत अनुदान द्यावे आदी मागण्या केल्या.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार