शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सरकारविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:51 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी करणाºया सेवानिवृत्तांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने सरकारविरुद्ध एल्गार पुकारत विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष केल्याचा आरोप : साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून साडेसात हजार रुपये पेन्शनची मागणी करणाऱ्या सेवानिवृत्तांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने सरकारविरुद्ध एल्गार पुकारत विद्यमान लोकप्रतिनिधींना मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.इपीएफ पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. या योजनेत देशभरातील १८६ उद्योग व संस्थांचे कर्मचारी समाविष्ट आहे. जवळपास ६० लाख पेन्शनर्स आहे. या सर्व पेन्शनर्सनी दरमहा साडेसात हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याची मागणी केली. मात्र सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. या योजनेत बँक कर्मचारी, एसटी महामंडळ, विद्युत महामंडळ, सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, जिनिंग-प्रेसिंग आदींच्या सेवानिवृत्तांचा समावेश आहे.सध्या दरमहा केवळ हजार रुपये पेन्शन मिळत असल्याने जीवन जगणे कठीण झाल्याचे समितीने म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने या मागणीवर विचार करण्यासाठी खासदारांची कोशियार समिती नेमली होती. या समितीने मासिक तीन हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती. मात्र नंतर सरकार बदलले.यानंतर प्रकाश जावडेकर केंद्रात मंत्री झाले. त्यांनी तीन महिन्यात प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही दिली. हंसराज अहीर यांनीही सरकार नवीन असल्याने थोडा वेळ देण्याची विनंती केली. त्याला आता चार वर्षे लोटूनही आणि चारदा आंदोलन करूनही सरकार दाद देत नसल्याचा आरोप सेवानिवृत्तांनी केला आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री, खासदार, आमदार व त्यांच्या पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय पेन्शनर राष्ट्रीय समन्वय समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे, याबाबत समितीने चक्क निषेध फलकही लावले आहे.तुटपुंज्या पेन्शनमुळे हालसध्या तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याने इपीएफ पेन्शनरांचे हाल होत असल्याचे समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत काळे यांनी सांगितले. एक हजार रुपयात साधा औषधाचाही खर्च होत नाही मग जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गजानन भावे यांनी उमेदीच्या काळात रात्रंदिवस एक करून कामे केल्याचे सांगून तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. सरकार दुर्लक्ष करीत असल्याने कुटुंब चालविण्यासाठी मोठी कसरत होत असल्याचे त्यांनी सांगितले.