शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
4
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
5
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
6
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
7
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
8
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
9
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
10
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
11
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
12
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
13
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
14
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
15
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
16
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
17
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
18
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
19
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
20
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...

वीज महावितरणचा पाटणबोरीत भोंगळ कारभार

By admin | Updated: May 14, 2016 02:28 IST

देयकाचे पैसे घेण्यास नकार :

देयकाचे पैसे घेण्यास नकार : भारनियमनाने ग्राहक त्रस्त, कनिष्ठ अभियंता करतात पांढरकवडा येथून ‘अप-डाउन‘पाटणबोरी : येथील वीज वितरण कंपनीच्या कारभाराने भोंगळपणाचा कळस गाठला आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भारनियमनाविरोधात नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.येथील वीज कार्यालयाला कुणीही वाली नाही. सर्व कामकाज ‘रामभरोसे’ सुरू आहे. येथे कनिष्ठ अभियंतापदी महिला आहे. त्या नियमित येत नसल्याचे ग्राहक सांगतात. ग्राहकांना तक्रारी देण्याकरिता पांढरकवडा येथे जावे लागते. स्वतंत्र क्वॉर्टर असूनही त्या पांढरकवडा येथून ये-जा करतात. गावातील ट्रान्सफार्मरचे मेंटेनन्स नसल्याने गेल्या १५ दिवसात पाच डी.पी. जळाल्या. त्यापैकी स्टेट बँकेच्या मागील डी.पी.चा बॉक्स बसविला. मात्र बाकीच्या चारची जुजबी दुरूस्ती करून त्या सुरू करण्यात आल्या आहे. येथील महावितरण कार्यालयाला ‘ट्री कटिंग’च्या नावाखाली वर्षाला एक लाखाच्यावर रक्कम येत असल्याची माहिती आहे. मात्र कित्येक ठिकाणी झाडावर विद्युत तारा आढळून येतात. उपकेंद्रातील गवत काढण्याकरिता वर्षातून दोनदा १०-१० हजार रूपये मिळत असल्याचीही माहिती आहे. मात्र उपकेंद्राच्या आवारात टोंगळ्यापर्यंत गवत वाढलेले दिसून येते. देयकाचे पैसे घेण्याकरिता कोणतीही व्यवस्था या कार्यालयाकडे नाही. डाक विभागाचे कर्मचारीही तुटवडा असल्याचे कारण देत देयक स्विकारण्याकरिता हात वर करतात. त्यामुळे ग्राहकांचा वाढता रोष बघून येथे देयक स्विकारून ते पांढरकवडा येथे रक्कम भरून पावती दुसऱ्या दिवशी देण्यात येत होती. मात्र त्यातही मोठ्या प्रमाणात घोळ झाला. देयक भरल्यानंतरही ते पुढील देयकांत लागून येत होते. परिणामी तक्रारी वाढल्या. देयक भरताना येथील महावितरण कार्यालय शिक्का मारून देत होते. पावती दुसऱ्या दिवशी मिळत होती. मात्र यामुळे ग्राहकांना दोनदा चकरा माराव्या लागत होत्या. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ वाढल्याने कनिष्ठ अभियंत्यांनी यावेळी देयके न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आता ग्राहकांना देयक भरण्याकरिता पांढरकवडा येथे जाण्याची वेळ आली आहे. येथील वीज अपकेंद्रात पाच के.व्ही.चे नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले. त्याची पूजा करून, नारळ फोडून चाचणी घेण्यात आली. मात्र ते सुरू करण्याकरिता महावितरणला अद्याप मुर्हूतच सापडला नाही. अर्थिंगकरिता पाणीही उपलब्ध नाही. त्यासाठी परवानगी नसल्याचे कारण कंपनीकडून देण्यात येते. येथील दोन लाईनमन वगळता उर्वरित कर्मचारी अनधिकृत आहेत. येथील जुन्या कर्मचाऱ्यांची बदली झाली, तर काही कर्मचारी ड्युटीच बजावत नसल्याच्या तक्रारी आहे. काही विशिष्ट आॅपरेटर आपल्या स्वत:च्या कामातच व्यस्त असतात. त्यांना ड्युटीकरिता वेळच मिळत नाही. (वार्ताहर)मीटर करिता उकळले जातात जादा पैसेकित्येकदा येथील सुरक्षा रक्षकच ड्युटी बजावताना दिसून येतो. आत्तापर्यंत जेवढे मीटर लावण्यात आले, त्या अनेकांना अद्याप अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचे ग्राहक सांगतात. १ हजार ६०० ते १ हजार ८०० रूपये अधिकृत रक्कम असलेल्या मीटरकरिता गोरगरीब जनता तीन हजार ते चार हजार रूपये देतात. मीटरकरतिाही जादा पैसे उकळले जात आहे. त्यामुळे या कार्यालयाकडून ग्राहकांची केवळ पिळवणूकच केली जात असल्याची ओरड सुरू आहे.